मुबई -बालभवनची इमारत ऐतिहासिक वास्तु असल्यामुळे तिचे जतन व संवर्धन करणे ही आपली जबाबदारी असल्याचे नमूद करुन ऐतिहासीक वास्तु आंतरराष्ट्रीय दर्जाची केली पाहिजे, असे प्रतिपादन शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी केले. त्यांनी आज बालभवनचा नूतनीकरण कामाचा उद्घाटन समारंभ केला आहे. बालभवनच्या इमारतीस ७० वर्षे पूर्ण होत असून इमारत जीर्ण झाली आहे, या इमारतीस दुरुस्तीची आवश्यकता आहे. मुलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देऊन बालभवनच्या अध्यक्षा व शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी या ऐतिहासिक इमारतीच्या नूतनीकरणाचा निर्णय घेतला होता.Body:एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण करावी - वर्षा गायकवाड
बालभवनची इमारत मुंबईमधील अतिशय महत्त्वाच्या अशा मरिन लाईन्स ठिकणी आहे. भव्य अशी वास्तु आपल्या सर्वांसाठी अभिमानास्पद बाब आहे. या वास्तुचे अशाप्रकारे नूतनीकरण करावे की लोकांना बघताक्षणी कळावे की ही बालभवनची इमारत आहे. यासाठी शिक्षण विभाग व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिका-यांनी एकत्रित बसून आपआपल्या संकल्पना मांडाव्यात व त्यानुसार पुढील कार्यवाहीची रुपरेषा आखून एक भव्य दिव्य अशी वास्तू निर्माण करावी अशी अपेक्षाही शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या प्रसंगी शालेय शिक्षण व सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी उपस्थित होते.