मुंबई -बकरी ईद निमित्त गोवंश हत्या ( cow slaughter ) ही होण्याची शक्यता असल्याने विश्व हिंदू परिषदेने ( Vishwa Hindu Parishad ) विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना पत्र लिहले आहे. येत्या 10 जुलै 2022 रोजी मुंबईसह राज्यात बकरी ईद मोठ्या प्रमाणात साजरी करण्यात येते. बकरी ईद ( Bakri Eid ) साजरी करताना बोकडाची हत्या करण्यात येते. त्याचप्रमाणे गोवंश हत्या ( cow slaughter ) होण्याची शक्यता आहे. असे, पत्र त्यांनी विधानसभा अध्यक्ष ( Assembly Speaker ) राहुल नार्वेकर यांना पाठवले आहे. त्यावर विधानसभा अध्यक्षांनी पोलिसांना विशेष काळजी घेण्याच्या सुचना दिल्या आहेत.
Cow Slaughter : बकरी ईदला गोहत्येची भीती; विधानसभा अध्यक्षांचे पोलिसांना पत्र - विधानसभा अध्यक्ष
बकरी ईद निमित्त गोवंश हत्या ( cow slaughter ) ही होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असे निर्देश राज्याचे विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर ( Assembly Speaker Adv Rahul Narvekar ) यांनी पोलिसांना पत्राद्वारे दिले आहेत.
बकरी ईदला गोहत्येची भीती; विधानसभा अध्यक्षांचे पोलिसांना पत्र
पोलिसांना दक्ष राहण्याच्या सुचना - राज्यात गोवंश हत्या प्रतिबंधात्मक उपाय योजना करून सर्वांनी गोवंश हत्या होणार नाही याची काळजी घ्यावी. असे निर्देश त्यांनी पोलिसांना दिले आहेत. विधानसभा अध्यक्षांनी दिलेल्या आदेशामुळे राजकीय वर्तळात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. राहुल नार्वेकर यांनी राज्याच्या पोलिस महासंचालकांना ( Director General of Police ) या संबंधात दक्ष राहण्याच्या सुचना दिल्या आहेत.