महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

माजी आयएएस अधिकाऱ्याची 4 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोन्ही आरोपींना जामीन - कौशल शहा आणि सागर कर्माकर यांना जामीन

एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची साडेचार लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. या प्रकरणी कुलाबा पोलिसांनी अटक केलेल्या कोलकाता येथील दोन्ही आरोपींना अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे.

माजी आयएएस अधिकाऱ्याची 4 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोन्ही आरोपींना जामीन
माजी आयएएस अधिकाऱ्याची 4 लाखाची फसवणूक करणाऱ्या दोन्ही आरोपींना जामीन

By

Published : May 19, 2022, 8:25 AM IST

मुंबई - माजी आयएएस अधिकाऱ्याची 4 लाख 5 हजार रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी कुलाबा पोलिसांनी अटक केलेल्या कोलकाता येथील दोन्ही आरोपींना अतिरिक्त महानगर दंडाधिकाऱ्यांनी अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. महानगर दंडाधिकारी आर एम नेर्लीकर यांनी कौशल शहा आणि सागर कर्माकर यांना प्रत्येकी 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर आणि अशाच रकमेसारख्या एक किंवा अधिक जामिनावर जामीन मंजूर केला. न्यायालयाने आरोपींना पुरावे किंवा साक्षीदारांशी छेडछाड न करण्याचे आणि निश्चित तारखांना न्यायालयात हजर राहण्याच्या अटी व शर्तींचे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत.

काय आहे प्रकरण -एका निवृत्त आयएएस अधिकाऱ्याच्या तक्रारीवरून या दोघांना अटक करण्यात आली. त्यांची साडेचार लाख रुपयांची सायबर फसवणूक करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निवृत्त आयएएस अधिकाऱ्याने ऑगस्ट 2021 मध्ये कोलकात्याला जाण्यासाठी विमानाचे तिकीट बुक केले होते. नंतर त्यांना काही कारणास्तव ट्रीप रद्द करायची होती. त्याने एका एजंटशी संपर्क साधला. ज्याने त्याला मोबाइल अॅप डाउनलोड करण्यास सांगितले. ज्याद्वारे टोळीतील सदस्यांनी तक्रारदाराच्या खात्यातून 4.5 लाख रुपये काढून घेतले.


कुलाबा पोलिसांना तपासात ज्या मोबाईल गॅलरीमध्ये सिमकार्ड दिले होते त्याचा शोध घेतला. शाह सुरुवातीला हे सिमकार्ड वापरत असलेल्या आरोपीने सांगितल्यानंतर पोलिसांनी शहा यांना अटक केली. त्याने कर्माकरला झारखंडमध्ये 20 सिमकार्ड दिल्याचे सांगितले. शहा आणि कर्माकर यांनी ही सिमकार्डे सत्यता पडताळून न पाहता विविध घोटाळेबाजांना विकली आणि त्यामुळे त्यांना अटक केली असे पोलिसांनी सांगितले. या सिमकार्डचा वापर देशभरातील लोकांना फसवण्यासाठी केला जात होता.

For All Latest Updates

TAGGED:

ABOUT THE AUTHOR

...view details