मुंबई -मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांनी दाखल केलेल्या खंडणी प्रकरणाचा तपास सीआयडी करत आहे. या प्रकरणात दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. निलंबित पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी मुंबई सत्र न्यायालयात जामीन करता अर्ज दाखल केला होता. या अर्जावर आज सुनावणी झाली असून न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत निकाल राखून ठेवला आहे. ( ransom case bail application reserved till December 7 )
7 डिसेंबरपर्यंत निर्णय ठेवला राखून -
मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये श्यामसुंदर अग्रवाल यांच्या तक्रारीवरून खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग पोलीस अधिकारी सचिन वाझे यांचा देखील समावेश आहे. या प्रकरणातील निलंबित निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांनी सीआयडीने अटक केली आहे. त्यांनी यापूर्वी न्यायदंडाधिकारी न्यायालयासमोर जामीन करीता अर्ज केला होता. मात्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळला होता. त्यानंतर त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अर्ज केला होता. आज त्या अर्जावर सुनावणी झाली असून न्यायालयाने 7 डिसेंबरपर्यंत निर्णय राखून ठेवला आहे.
काय आहे प्रकरण ?
गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरिक्षक आशा कोकरे, पोलीस निरिक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली आहे. सध्या ते दोन्ही आरोपी न्यायालयीन कोठडीत आहे.
हेही वाचा - Anil Deshmukh Remand Extended : अनिल देशमुख यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ