मुंबई -दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील ड्रग्जचं प्रकरण बाहेर आलं. बॉलिवूडमधील ड्रग्ज प्रकरणात ज्या कलाकारांची नावं समोर आली नंतर एनसीबीकडून चौकशीही करण्यात आली होती त्यानंतर एनसीबीने ड्रग्ज प्रकरणात अभिनेता एजाज खानला ताब्यात घेतलं होते आज एजाज खान यांच्या पत्नी आयशा एजास खाना ची चौकशी करिता एमसीबी कार्यालयात बोलून चौकशी केली.
एजाज खानच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी - etv bharat maharashtra
काही दिवसांपूर्वी एनसीबीने पश्चिम उपनगरातून ड्रग्स माफिया फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा आणि त्याचा मित्र शाहरुख बुलेट या दोघांना अंमली पदार्थांसह अटक केली होती. हे दोघे बॉलिवूड, रेव्ह पार्टी, मुंबईतील पब्समध्ये ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचे चौकशीत समोर आले होते.
![एजाज खानच्या पत्नीची एनसीबीकडून चौकशी ejaz and ayesha khan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-13429014-thumbnail-3x2-r.jpg)
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एजाज खानचा सहभाग
बिग बॉसच्या सातव्या सिझनमध्ये एजाज खानने सहभाग घेतला होता. बिग बॉसमध्येही एजाज खान नेहमी चर्चेत राहिला होता. दरम्यान बिग बॉसमध्येही एजाजचे अनेक वाद झाले होते. याच वादावादीवरून त्याला शोच्या बाहेर काढण्यात आलं होतं.
बटाटाच्या चौकशीत एजाजचे नाव
काही दिवसांपूर्वी एनसीबीने पश्चिम उपनगरातून ड्रग्स माफिया फारूख बटाटा याचा मुलगा शादाब बटाटा आणि त्याचा मित्र शाहरुख बुलेट या दोघांना अंमली पदार्थांसह अटक केली होती. हे दोघे बॉलिवूड, रेव्ह पार्टी, मुंबईतील पब्समध्ये ड्रग्सचा पुरवठा करत असल्याचे चौकशीत समोर आले होते. तसेच शादाब बटाटा यांच्या संपर्कात बॉलिवूडमधील अनेक मोठे अभिनेते असल्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. एनसीबीने या दोघांकडे कसून चौकशी केली असता बॉलिवूड अभिनेता एजाज खानचे नाव समोर आले.
2018 मध्येही झाली अटक
एजाज खानला यापूर्वी 2018 मध्ये बंदी घातलेली औषधे बाळगल्याप्रकरणी अटक झाली आहे. त्यावेळेस त्याच्याकडून 8 एक्सटेसी टेबलेट मिळाल्या होत्या. याची बाजारातील किंमत 2.2 लाख रुपये होती.
हेही वाचा -कोरेगाव भीमा चौकशी आयोगाने बजावले परमबीर सिंह आणि रश्मी शुक्ला यांना समन्स