महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महिला दिनी गिफ्ट: महिलांच्या नावे घर घेतल्यास मुद्रांक शुल्कात मोठी सवलत - अजित पवार महिला दिन गिफ्ट योजना

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे.

women developement
महिला विकास

By

Published : Mar 8, 2021, 3:00 PM IST

मुंबई -आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त अर्थमंत्री अजित पवार यांनी महिलांना मोठी भेट देणाऱ्या योजना जाहीर केल्या आहेत. महिलांच्या नावे घरे खरेदी केल्यास १ एप्रिलपसाून मुद्रांकावर सवलत मिळणार आहे.

राजमाता जिजाऊ गृहस्वामिनी योजनेची घोषणा करण्यात आली आहे. घरातील महिलेच्या नावावर घराची नोंदणी झाल्यास मुद्रांक शुल्कामध्ये सवलत दिली जाणार आहे.

हेही वाचा-बजरंग पुनिया ठरला जगातील अव्वल कुस्तीपटू

  • ग्रामीण विद्यार्थिनींच्या मोफत बस प्रवासासाठी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुलेंच्या नावाने योजना. १,५०० सीएनजी आणि हायब्रिड बस उपलब्ध करुन देण्यात येणार.
  • शहरांमध्ये 'तेजस्विनी' योजनेंतर्गत बसस वाढवणार.
    महिला दिनी गिफ्ट
  • राज्य राखीव पोलीस दलामध्ये स्वतंत्र महिला गट स्थापन होणार.
  • महिला व बालविकास विभागासाठी ३,७६७ रुपयांची राज्य आणि केंद्राची एकत्रित तरतूद.
  • सामाजिक सुरक्षा व कल्याण योजनेसाठी बीजभांडवल म्हणून २५० कोटी रुपयांची तरतूद. यामध्ये जमा होणाऱ्या रकमेतून घरकाम करणाऱ्या महिलांसाठी योजना राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा-मराठा आरक्षणावर सुनावणी स्थगित; 15 मार्च रोजी होणार पुढील सुनावणी

ABOUT THE AUTHOR

...view details