महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

मुंबईत कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढ, गर्दी टाळण्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांचे आवाहन - गर्दी टाळा आवाहन मंत्री राजेश टोपे

राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा पार केला. गर्दीमुळे संक्रमण वाढत असून नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी केले.

प्रतिकात्मक
प्रतिकात्मक

By

Published : Dec 30, 2021, 8:37 PM IST

मुंबई - राज्यासह मुंबईत कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. आज मुंबईत कोरोना रुग्णसंख्येने चार हजारांचा टप्पा पार केला. गर्दीमुळे संक्रमण वाढत असून नागरिकांनी गर्दी टाळावी, असे आवाहन आरोग्य मंत्री राजेश टोपे ( Health Minister Rajesh Tope ) यांनी केले.

हेही वाचा -Mumbai Police On High Alert : मुंबईत हाय अलर्ट! खलिस्तानी दहशतवादी मुंबईला लक्ष्य करण्याच्या तयारीत.. पोलिसांच्या सुट्ट्या रद्द

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्ये पॉझिटिव्हिटी रेट वेगाने वाढले आहेत. मुंबईत आज तब्बल चार हजार रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेत. ओमायक्रॉनचा प्रादुर्भाव देखील वाढत आहे. कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेत राज्यातील टास्क फोर्स, मुख्यमंत्री आणि संबंधित मंत्र्यांची बैठक घेण्यात आली. त्यानंतर, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली.

दोन दिवसांत निर्णय

मुंबईत रुग्ण वाढत आहेत. बुधवारी 2 हजार 200 रुग्ण आढळून आले होते. आज हाच आकडा जवळपास 4 हजारांच्या जवळ पोहचला आहे. पॉझिटिव्हिटी रेट सुद्धा 8.48 पर्यंत गेला आहे. वाढती रुग्णसंख्या चिंता वाढवणारी आहे. त्यामुळे, गर्दी टाळलीच पाहिजे. गर्दीमुळे संक्रमण वाढेल, असे मत आजच्या बैठकीत टास्क फोर्ससह आणि इतरांनी मते मांडली. त्यामुळे, गर्दी कमी करण्याच्या दृष्टीने निर्णय होऊ शकतो. येत्या दोन दिवसांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अंतिम निर्णय घेतील, असे राजेश टोपे यांनी सांगितले.

चाचण्या वाढवणार

वाढती रुग्णसंख्या चिंतेचा विषय बनली आहे. त्यामुळे, टेस्टींग वाढण्यावर भर दिला जाईल. या संदर्भात एचडीटीएफ कीटचा वापर करण्याचे ठरले आहे. लसीकरणाबाबतही निर्णय घेण्यात आला असून 15 ते 18 वयोगटांतील तरुणांना लसीकरण करायचे आहे. त्यासाठी, शाळा किंवा कॉलेज बंद न करता विशेष मोहिमेतून त्यांना लसीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे राजेश टोपे यांनी सांगितले.

हेही वाचा -BMC Year Ender 2021 - भाजप, शिवसेना यांच्यातील वादासह 'या' घटनांमुळे वर्षभर चर्चेत राहिली बीएमसी

ABOUT THE AUTHOR

...view details