महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Avinash Bhosale Remanded in CBI Custody : अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी - अविनाश भोसले मुंबई सत्र न्यायालय

डीएचएफएल येस बँक प्रकरणात अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या अविनाश भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 8 जूनपर्यंत CBI कोठडी दिली.

उद्योगपती अविनाश भोसले

By

Published : May 31, 2022, 6:05 PM IST

Updated : May 31, 2022, 6:58 PM IST

मुंबई - डीएचएफएल येस बँक प्रकरणात अविनाश भोसले यांना 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावण्यात आली आहे. डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात सीबीआयने अटक केलेल्या अविनाश भोसले यांना मुंबईतील विशेष सीबीआय न्यायालयाने 8 जून पर्यंत CBI कोठडी दिली.

डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात उद्योगपती अविनाश भोसले यांना आज मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टाने 8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी सुनावली आहे. 26 मे रोजी रात्री सीबीआयने अटक केली होती. सीबीआयने केलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा अविनाश भोसले यांचा दावा कोर्टाने फेटाळला आहे. तसेच सीबीआयला अविनाश भोसले यांना मुंबईबाहेर नेण्यास मनाई कोर्टाने केली आहे

8 जूनपर्यंत सीबीआय कोठडी - डीएचएफएल आणि येस बँक प्रकरणात उद्योगपती अविनाश भोसले यांना 26 मे रोजी रात्री सीबीआयने अटक केली होती. त्यानंतर त्यांना 27 मे रोजी न्यायालयात हजर करण्यात आले होते. शुक्रवारी वेळेअभावी दोन्ही पक्षकारांचे युक्तिवाद पूर्ण होऊ शकला नाही, त्यामुळे 30 मे रोजी पुन्हा अविनाश भोसले यांना हजर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. 30 रोजी दोन्ही पक्षकारांकडून युक्तिवाद पूर्ण करण्यात आला असला तरी आज वेळेअभावी न्यायालयाने अविनाश भोसले यांच्या CBI कोठडीवर निर्णय राखीव ठेवला होता. त्यावर आज न्यायालयाने निर्णय देत त्यांना 8 जूनपर्यंत कोठडी सुनावली आहे.

अटक केल्यानंतर अविनाश भोसले यांना मुंबई सत्र न्यायालयात हजर करण्यात आलं. यावेळी सीबीआयकडून अविनाश भोसले यांची 10 दिवसांची कोठडी मागण्यात आली होती. पण मुंबई सत्र न्यायालयाने अविनाश भोसले यांना नजरकैदेत ठेवण्याचे निर्देश दिले होते. अविनाश भोसले यांच्यावर करण्यात आलेली कारवाई बेकायदेशीर असल्याचा दावा करत भोसलेंच्या वकिलांनी रिमांडला विरोध केला. भोसले यांना वरळी इथल्या घरी किंवा सेंट रेजिस पंचताराकिंत हॉटेलमध्ये नजरकैदेत ठेवण्यात यावे अशी मागणी त्यांच्या वकिलांनी केली होती.

हेही वाचा - CBI Raid in Pune and Mumbai : येस बँक आणि एचडीएफएल घोटाळा प्रकणी आठ ठिकाणी छापे

नेमकं प्रकरण काय - पुण्याचे बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांना गुरुवारी रात्री CBI कडून अटक करण्यात आली. DHFL प्रकरणात त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता. यातूनच त्यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली. गेल्या वर्षी जून 2021 मध्ये अविनाश भोसले आणि त्यांच्या कुटुंबीयातील सदस्यांच्या नावावर असलेली तब्बल 40 कोटी 34 लाख रुपयांची संपत्ती ईडीकडून जप्त करण्यात आली होती. विदेशी मुद्रा प्रबंधन अधिनियमांतर्गत ही कारवाई करण्यात आली होती.

DHFL घोटाळा प्रकरणानंतर त्यांना सीबीआयकडून अटक करण्यात आली आहे. अविनाश भोसले आज कोट्यवधी रुपयांच्या DHFL ग्रुपचे मालक आहेत. रिअल इस्टेट किंग अशी त्यांची पुण्यामध्ये ओळख आहे. अविनाथ भोसले यांच्या ओळखीतील लोक सांगतात की 80 च्या दशकात ते रिक्षा चालवत असत. बांधकाम व्यवसायात आल्यानंतर सुरुवातीला कंत्राटदार ते आता पुण्यातील रिअल इस्टेट किंग अशी त्यांची ओळख आहे.

हेही वाचा -Raj Thackeray Surgery : 'या' कारणामुळे होणार राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया; जाणून घ्या, डॉक्टरांचे मत...

Last Updated : May 31, 2022, 6:58 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details