मुंबई- पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली आहे. विदेशी चलन प्रकरणात चौकशी करण्यात आल्याचे सूत्रांकडून कळत आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात अविनाश भोसले यांच्या संदर्भात काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांना चौकशीसाठी मुंबईतल्या ईडी कार्यालयात येण्याचे समन्स बजावण्यात आले होते. त्यानुसार अविनाश भोसले हे शुक्रवारी ईडी कार्यालयात हजर झाले होते. तब्बल 10 तासाहून अधिक वेळ ईडी अधिकाऱ्यांनी अविनाश भोसले यांची चौकशी केली आहे.
विदेशी चलनप्रकरणी कारवाई -
विदेशी चलन प्रकरणी व काही महागड्या वस्तू परदेशातून आणल्याप्रकरणी ही चौकशी केली जात असल्याचे सूत्रांकडून कळते. 2007 मध्ये अशाच प्रकारची चौकशी करण्यात आली होती व आयकर विभागाकडूनही अविनाश भोसले यांच्या आर्थिक व्यवहाराबाबत छापेमारी करण्यात आली होती.
पुण्यातील व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडी चौकशी - अविनाश भोसलेंच्या घरी छापेमारी
पुण्यातील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक अविनाश भोसले यांची ईडीकडून तब्बल दहा तास चौकशी करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसात पुण्यात अविनाश भोसले यांच्या संदर्भात काही ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर अविनाश भोसले यांना चौकशीसाठी मुंबईतल्या ईडी कार्यालयात येण्याचे समन्स बजावण्यात आले होते.
ईडी
कोण आहेत अविनाश भोसले -
महाराष्ट्रातील प्रसिद्ध बांधकाम उद्योग व्यावसायिक आहेत. ते अविनाश भोसले इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या बांधकाम कंपनीचे मालक असून कॉंग्रेसचे नेते, माजी वनमंत्री पंतगराव कदम यांचे व्याही आहेत.