मुंबई -मुंबईमधील गिरगाव चौपाटीवर लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत ते ऑगस्ट क्रांती मैदान ( August Kranti Maidan ) पर्यंत स्वातंत्र्यसैनिक ज्येष्ठ विचारवंत डॉक्टर जी. जी. पारिख, ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी, तसेच दृश्य सामाजिक कार्यकर्त्या मेधाताई पाटकर ( Medhatai Patkar ) तसेच मध्य प्रदेश राज्याचे माजी मुख्यमंत्री काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह ( Congress leader Digvijay Singh ) , तुषार गांधी या मान्यवरांच्या पुढाकारात ऑगस्ट क्रांती मैदानापर्यंत स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या निमित्ताने ( Azadi Ka Amrit Mohatsav ) लोकशाहीरक्षणासाठी भव्य मिरवणूकचे आयोजन करण्यात आले . तसेच आज पासून द्वेषमुलक भावना हटवा हि मोहीम देखील सुरु केली .
स्वातंत्र्य लढ्यातील शहिदांचे स्मरण -9 ऑगस्ट 1942 या दिवशी महात्मा गांधींच्या ( Mahatma Gandhi ) ब्रिटिशांना भारत सोडा ( Quit India Movement ), या घोषणेने अवघा देश दुमदुमला . शाळेचे महाविद्यालयाचे विद्यार्थी सरकारच्या त्या वेळच्या सेवेत असलेले पोलीस, अन्य कर्मचारी यांनी देखील बंड केलं . मुंबईला ऑगस्ट क्रांती मैदान या ठिकाणाहून अरुणा सफली, महात्मा गांधी अनेक अशा थोर नेत्यांच्या पुढाकारात स्वातंत्र्याचा रणशिंग फुंकलं . स्वातंत्र्य मिळवण्याचा नवीन टप्पा त्या ठिकाणाहून सुरू झाला. अनेक शहीद क्रांतिकारकांनी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिलं. आज स्वातंत्र्यासाठी लढलेल्या त्या ज्ञात अज्ञात सर्व शहिदांना आठवण करण्यासाठी तसेच स्वातंत्र्य, समता, बंधुता हे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी गिरगाव चौपाटी शेजारी लोकमान्य टिळकांच्या पुतळ्यापासून ते ऑगस्ट क्रांती मैदान पर्यंत ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक यांच्या पुढाकारांमध्ये अबालृद्ध, सामाजिक संघटना, पर्यावरणवादी संघटना, शिक्षक, विद्यार्थी संघटना अशा सर्वांनी सहभाग घेतला.
द्वेषमूलक भावना हटवा- ऑगस्ट क्रांती दिनाच्या संदर्भात ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर जी जी पारीख यांनी ईटीव्ही भारतला सांगितलं की,' पुन्हा गांधींनी सांगितलेल्या मार्गावर आपल्याला जावे लागणार. पुन्हा स्वातंत्र्याची नवी लढाई आपल्याला या आजच्या हुकूमशाहीच्या काळामध्ये करावी लागणार आहे . त्यासाठी सर्वांना एकजुटीचा आवाहन त्यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना केलं. तसेच शंभरी पार केलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्ता गांधी हे देखील या ठिकाणी उपस्थित होते . त्यांनी ई टीव्ही भारत शी बोलताना आपली प्रतिक्रिया दिली . ते म्हणाले,' ज्यासाठी आम्ही हे स्वातंत्र्य मिळवलं . ते स्वातंत्र्य अजूनही टप्प्यात आलेल दिसत नाही. म्हणूनच राम मनोहर लोहिया, जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचा जो नारा दिला होता तो नारा अजूनही अपूर्ण आहे. आम्ही जोपर्यंत जिवंत असू तोपर्यंत लोकशाही रक्षणासाठी या देशासाठी लढत राहू. आजच्या पिढीने देखील हे स्वातंत्र्याचे महत्त्व समजून घेतलं पाहिजे;'असं देखील त्यांनी ईटीव्हीला सांगितले.