मुंबई - पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक नवनवे प्रकल्प राबवून उद्यानं, किल्ले आणि परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू आहे. आज मंत्रालयातील दालनात आयोजित बैठकीत विविध प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
ऑगस्ट क्रांती मैदान, गेटवे ऑफ इंडिया परिसराचे होणार सुशोभीकरण - मंत्री आदित्य ठाकरे - मंत्री आदित्य ठाकरे यांची घोषणा
पर्यटनाला चालना देण्यासाठी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. अनेक नवनवे प्रकल्प राबवून उद्यानं, किल्ले आणि परिसर सुशोभित करण्याचे काम सुरू आहे.
![ऑगस्ट क्रांती मैदान, गेटवे ऑफ इंडिया परिसराचे होणार सुशोभीकरण - मंत्री आदित्य ठाकरे Aaditya Thackeray](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-15579973-731-15579973-1655392880314.jpg)
ऑगस्ट क्रांती मैदानाचं सुशोभीकरण -मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानाला ऐतिहासिक वारसा लाभलेला आहे. महात्मा गांधी यांनी 'भारत छोडो' चळवळीची सुरुवात याच मैदानातून केली होती. ऑगस्ट क्रांती मैदानाचा इतिहास पुनर्जीवित करण्यासाठी मैदानाचे सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ऑगस्ट क्रांती मैदानाच सुशोभीकरण दोन ट्प्यांमध्ये होणारं आहे. स्वातंत्र्य चळवळीच्या मार्गाची ओळख निर्माण करण्यासाठी फूटपाथचं सुशोभीकरण केलं जाणार आहे. त्याच बरोबर ऑगस्ट क्रांती मैदानात चळवळीचा इतिहास मांडला जावा असे आदेश आदित्य ठाकरे यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत.
मुंबईच्या प्रवेशद्वावर तिरंगा फडकणार -गेटवे ऑफ इंडियाचं सुशोभीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत स्वतंत्र होऊन ७५ वर्षे पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने मुंबईच्या गेटवे ऑफ इंडिया इथे ७५ फुटाचा तिरंगा उभारला जावा अशी संकल्पना पर्यटन मंत्री आदित्य ठाकरेंनी यांनी मांडली.