मुंबई - नवाब मलिक (Nawab Malik) यांनी एक नवी ऑडिओ क्लिप (Audio Clip) ट्विटरवर शेअर केली आहे. यामध्ये अनिल बोंडे (Anil bonde) यांचा आवाज असल्याचा मालिकांचा दावा आहे. यात अनिल बोंड अमरावतीमध्ये झालेल्या दंगली (Amravati Violence) संदर्भात बोलताना दिसत आहे. त्यावर "झूट बोले कव्वा काटे" असं म्हणत म्हणत नवाब मलिक यांनी टीका केली आहे.
त्रिपुराच्या कथित घटनेबाबत (Tripura violence) पडसाद महाराष्ट्रात उमटलेले पाहायला मिळाले. नांदेड अमरावती आणि मालेगाव या तीन ठिकाणी काढण्यात आलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. खास करून अमरावतीमध्ये मोठा हिंसाचार झाला होता. हा हिंसाचार भाजपचे आमदार अनिल बोंडे (Anil bonde) यांनी भडकला असल्याचा दावा करणारे ट्विट राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. नवाब मलिक यांनी एक ऑडिओ क्लिप जाहीर केली असून या ऑडिओ क्लिप मधला आवाज भाजप आमदार अनिल बोंडे यांचा असल्याचा दावा नवाब मलिक यांनी केलाय. तसेच "झूट बोले कव्वा काटे" असं म्हणत हा ऑडिओ क्लिप ट्विट केला आहे.