महाराष्ट्र

maharashtra

Atul bhatkhalkar tweet : 'आदित्य ठाकरेंचे पर्यावरणप्रेम साफ बुडाले...; भातखळकरांची टीका

By

Published : Jan 23, 2022, 3:56 PM IST

शहरातील झाडेकापणीच्या विरोधात पर्यावरणवादी अभय आझाद यांनी संताप व्यक्त केला होता. यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar tweet) यांनी ट्विट करत टीका केली आहे.

bhatkhalkar tweet
bhatkhalkar tweet

मुंबई - शहरातील झाडेकापणीच्या विरोधात पर्यावरणवादी अभय आझाद यांनी संताप व्यक्त केला होता. त्यांनी विरोध केल्याने यांच्यावर पोलीस कारवाई करण्यात आली आहे. शंभर वर्षे जुने झाड तोडण्याचा विरोध त्यांना भोवला आहे.


यावर भाजप आमदार अतुल भातखळकर (Atul Bhatkhalkar tweet) यांनी ट्विट करत टीका केली आहे. ‘सत्तेची ऊब मिळाल्यापासून पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचे पर्यावरण प्रेम साफ बुडाल्याचे दिसते. त्यांची आंदोलनकर्ती बॉलिवूड गँगही गायब झाली आहे.’ अशी टीका अतुल भातखळकर यांनी ट्विट करत केली आहे. मुंबईच्या विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये झाड कापण्याचा विरोध केल्यामुळे अभय आझाद यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. विलेपार्लेच्या रेल्वे परिसरामध्ये मुंबई महानगरपालिकेनं एक झाड कापण्याची परवानगी दिली होती. मात्र, या झाड कापण्याला त्यांनी विरोध केला. यावेळी विलेपार्ले पोलिसांनी त्यांना जबरदस्तीनं पोलीस व्हॅनमध्ये टाकल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

विलेपार्ले येथे तोडण्यात आले झाड
मागील अनेक दिवसांपासून मुंबईतील विलेपार्ले परिसरात विविध विकास कामांसाठी वृक्षतोड करण्यात येत आहे. अशातच विलेपार्ले पूर्व परिसरातील गावठाण भागातील रस्ता रुंदीकरणासाठी १०० वर्ष जुने वडाचे झाड महापालिकेच्यावतीनं तोडण्यात येत होते. अशातच एक वृक्षतोड विरोधी कार्यकर्ता अभय आझाद यासंदर्भात जाब विचारण्यासाठी गेला असता त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र, नंतर पोलीस स्थानकात आणल्यानंतर मोठा विरोध झाल्याने त्याला सोडून देण्यात आले आहे. मुंबई पोलिसांनी झालेल्या प्रकाराबद्दल ट्वीट करत दिलगिरी व्यक्त केली आहे.

हेही वाचा -Fire Brigade Information In RTI : अग्निशमन दलाची माहिती देण्यास टाळाटाळ; आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांचा खुलासा

ABOUT THE AUTHOR

...view details