मुंबई -विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर १४ दिवस उलटले तरी अद्यापही महाराष्ट्रात सत्तासंघर्ष सुरूच आहे. मुख्यमंत्री पदावरून युतीतला तिढा काही सुटताना दिसत नाही. यातच जुन्या सरकारची मुदत संपत असल्याने त्यानंतर कोणते उपाय योजता येतील, अथवा पाऊले उचलावीत, याबद्दल सल्ला घेण्यासाठी आणि चर्चा करण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना राजभवनात पाचारण केले आहे.
हेही वाचा... शिवसेनेकडे असलेले संख्याबळ सभागृहात दाखवू - संजय राऊत
राज्यातील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर काय तोडगा काढावा? हा प्रश्न राज्यपालांसमोर उभा राहिला आहे. त्यामुळेच या प्रश्नावर कायदेशीर सल्ला घेण्यासाठी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांना पाचारण केलंय. शुक्रवारी राज्यातील अस्तित्वात असलेल्या विधानसभेची मुदत संपत आहे. यासर्व पार्श्वभूमीवर महाधिवक्ता आणि राज्यपाल यांची चर्चा होईल.