मुंबई -मुंबईतील अँटोप हिल परिसरात तरुणाचा खून करून मृतदेह जाळण्याचा प्रयत्न केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना रविवारी रात्रीची आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. (Murder of a young man in the Antop Hill area) अब्दुल सलाम मुनवर अली सय्यद असे मृत तरुणाचे नाव असून, त्याचे वय २९ वर्षे आहे.
मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत
अब्दुलला काही लोकांनी अँटोफिल भागातील केंद्रीय सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पाठीमागे सेक्टर क्रमांक १ मध्ये बोलावले. घटनास्थळी गेल्यावर त्याच्यावर बेदम मारहाण करण्यात आली, त्यामुळे मृताच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.