मुंबई - जोगेश्वरी परिसरातील एका ज्वेलरी शॉपवर दिवसाढवळ्या लुटीचा प्रयत्न करणाऱ्या चोराला खुद्द दुकान मालकानेच धाडस करून पकडल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे.
Video : ज्वेलरी दुकान लुटण्याचा प्रयत्न करणाऱ्या चोराला पकडले रंगेहाथ - ज्वेलरी दुकानात दरोड्याचा प्रयत्न
रमेश जिवारामजी हे जोगेश्वरी परिसरात कुमार ज्वेलर्स नावाने दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात ही घटना घडली.

रमेश जिवारामजी हे जोगेश्वरी परिसरात कुमार ज्वेलर्स नावाने दुकान चालवतात. त्यांच्या दुकानात 12 ऑगस्टला एक व्यक्ती येते. ही व्यक्ती सुरुवातीला दागिने दाखविण्याचा बहाणा करते आणि नंतर जवळील पिशवीतून सुरा काढून दुकान मालकाला धमकावत असल्याचे या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. मात्र, या प्रसंगाला न घाबरता रमेश जीवरामजी हे या चोरट्याला पकडण्याचा प्रयत्न करतात. या दोघांमध्ये झालेल्या झटापटीत चोर पळून जाण्याचा प्रयत्न करत दुकानाबाहेर येतो. मात्र, दुकान मालक त्याला पकडण्याचा पूर्ण शक्तीनिशी प्रयत्न करतो. काही वेळातच दुकान मालकाच्या मदतीला रस्त्यावरील नागरिक येतात. या चोराला पकडून येथेच्छ बडविण्यात येते. याप्रकरणी जोगेश्वरी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून अधिक तपास सुरू आहे.