मुंबई -मुंबईतील विशेष एनआयए न्यायालयात 2008 मालेगाव ब्लास्ट प्रकरणाची सुनावणी सुरू आहे. आज झालेल्या सुनावणीत एका साक्षीदाराने धक्कादायक खुलासा केला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ ( Cm Yogi Adityanath ) यांना या प्रकरणात गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचा दावा साक्षीदाराने न्यायालयात केला आहे.
हेही वाचा -Varsha Gaikwad Positive : शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण
सुनावणीत या प्रकरणातील साक्षीदार क्रमांक 40 याने अतिशय धक्कादायक खुलासे न्यायालयासमोर केले. एटीएस अधिकाऱ्यांनी आपल्यावर दबाव टाकला की, जर आपण त्यांच्या म्हणण्यानुसार जबाब दिला नाही तर, आपल्या कुटुंबाला इजा पोहोचवण्यात येईल. आपल्या जबाबात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या काही मोठ्या पदाधिकाऱ्यांच्या नावांचा उल्लेख करावा, यासाठी एटीएस आपल्यावर दबाव टाकत आहे, असा दावा साक्षीदाराने न्यायालयात केला.
इंद्रेश कुमार, योगी आदित्यनाथ, स्वामी असिमानंद, प्रो. देवधर यांची नावे आपल्या जबाबात नोंदवावी याबद्दल एटीएस साक्षीदारांवर दबाव टाकत असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. साक्षीदार हा अभिनव भारत या संघटनेशी सबंधित आहे. त्याने तत्कालीन एटीएसचे अधिकारी परमबीर सिंग आणि डीसीपी श्रीराव यांच्या संदर्भात आक्षेपसुद्धा नोंदवले. आतापर्यंत या प्रकरणामध्ये 15 साक्षीदारांनी आपली साक्ष फिरवली आहे.
हेही वाचा -Gopal Shetty Arrested: भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांना पोलिसांनी ताब्यात घेतले