मुंबई - गेल्या चार महिन्यापासून आझाद मैदानांवर कर्मचाऱ्यांचे शांततेत आंदोलन सुरू ( ST Workers Agitation Azad Maidan ) होते. मुंबई उच्च न्यायालयाने ( Mumbai HC On ST Workers Strike ) दिलासादायक निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी जल्लोष सुद्धा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची तारीख सुद्धा ठरवली होती. मात्र, या महाविकास आघाडी सरकारला हे पचल नाही आणि त्यांनी कट रचून गुणरत्न सदावर्ते साहेबांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप वकील गुणरत्न सदावर्ते ( Advocate Gunratna Sadavarte ) यांच्या पत्नी जयश्री पाटील ( Jayashree Patil Allegation On MVA Government ) यांनी केला आहे.
सरकारने कट रचला- गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी ऍड जयश्री पाटील यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले की, गेल्या चार महिन्यापासून आझाद मैदानांवर एसटी कर्मचारी शांतप्रिय आंदोलन सुरू होते. गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी एसटी कर्मचाऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय दिल्यानंतर आझाद मैदानावर कर्मचाऱ्यांनी जल्लोषा सुद्धा केला होता. न्यायालयाच्या आदेशानंतर कर्मचाऱ्यांना कामावर जाण्याची तारीख सुद्धा ठरवली होती. मात्र, या महाविकास आघाडी सरकारला हे पचल नाही आणि त्यांनी कट रचून गुणरत्न सदावर्ते साहेबांना फसवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील यांनी केला आहे.
कट रचून गुणरत्न सदावर्ते यांना फसवण्याचा प्रयत्न - जयश्री पाटील
आमचा संविधानावर विश्वास-जयश्री पाटील यांनी सांगितले की, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि खासदार सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सतत बोलत असल्याने सूडबुद्धी पोटीही कारवाई केली आहेत. तुम्ही संविधान पेक्षा मोठे नाही आहेत. अनिल देशमुख यांच्यावर कारवाई झाली तशीच पवारांवर पण लवकर होईल असा आरोप सुद्धा जयश्री पाटील यांनी केला आहेत. आपल्या तक्रारीनंतर 600 कोटी रुपयांचा घोटाळ्याची चौकशी सुरू आहे आणि लवकरच तीन लोक जेलमध्ये असतील, असेही त्यांनी आज माध्यमासमोर सांगितले आहेत.
जयश्री रामचे नारे लगावले सरकार नाराज-गुणरत्न सदावर्ते यांचे वकील महेश वासनांनी यांनी सांगितले की, ज्यावेळी शरद पवार यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी सदावर्ते त्या ठिकाणी नव्हते. ते मॅट कोर्टात हजर होते. गुणरत्न सदावर्ते हे उच्चशिक्षित आहे. त्यांच्या घरावर हल्ला झाल्याने त्यांना पोलीस संरक्षण देण्यात आले होते. पवार यांच्या घरावर हल्ला झाला त्यावेळी जखमी झालेल्या पोलिसांचा रिपोर्ट का नाही? सदावर्ते यांच्या या हल्ल्यात सहभाग नाही, असे मी न्यायालयात सांगितले.
जय श्रीराममुळे सरकार नाराज :आंदोलनादरम्यान जयश्री रामचे नारे लगावले आहेत. त्यामुळे सरकार नाराज असल्याने वासवानी यांनी म्हटले आहे. सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांना महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर चालायला शिकवले. एफआयआरमध्ये आरोपी पुरावे नष्ट करेल, असे कुठेही म्हटलेले नाही. त्यामुळे त्यांना जामीन द्यावा, अशी मागणी न्यायालयात केली होती.
दोन दिवस पोलीस कोठडी -शरद पवारयांच्या घरावर झालेल्या आंदोलनाप्रकरणी ( Sharad Pawar Home Silver Oak Attack ) वकील गुणरत्न सदावर्ते (Gunaratna Sadavarte Police Custody) यांना 11 एप्रिल म्हणजेच दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर इतर 109 एसटी कर्मचाऱ्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. किला कोर्टात याबाबत आज सुनावली झाली. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतील सिलव्हर ओक घरावर 8 एप्रिलला एसटी कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत हल्ला केला होता. याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते यांच्यासह ११० आरोपीना किल्ला कोर्टात हजर करण्यात आले. न्यायमूर्ती सावंत यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली. यानंतर सदावर्ते यांच्यासह सर्व आरोपींची चौकशी कारण्याची गरज असल्याने त्यांना १४ दिवसांची पोलीस कोठडी मागण्यात आली होती. गुणरत्न सदावर्ते यांच्या बाजूने त्यांच्या पत्नी जयश्री पाटील व महेश वासवानी यांनी बाजू मांडली. तर सरकारच्यावतीने प्रदीप घरत यांनी बाजू मांडली.
माझी हत्या केली जाऊ शकते - गुणरत्न सदावर्ते :गुणरत्न सदावर्ते यांना पोलीस ठाण्यातून कोर्टात घेऊन जात असताना त्यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. माझी हत्या केली जाऊ शकते, तसेच हा लोकशाहीचा गळा घोटल्याचा प्रकार असल्याचे गुणरत्न सदावर्ते म्हणाले.