महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Shivsena Supporters in Taj Convention Center : सेना समर्थक गाड्यांचा ताज कन्व्हेन्शनमध्ये घुसण्याचा प्रयत्न; पोलिसांनी हाणून पाडला डाव - सीमेवर पोलीस बंदोबस्त

शिवसेनेचे आमदार गोव्यात दाखल झाल्यानंतर पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्रीच्या सुमारास शिवसेनेचे बंडखोर आमदार गोव्यात येणार ( Shiv Sena rebel MLA in Goa ) असल्याच्या सूचना मिळताच काही महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या ( Four wheelers of Maharashtra Passing ) विशेषतः सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्या हॉटेलमध्ये ( Taj Convention Center ) घुसण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावेळी पोलिसांनी या सर्व गाड्यांची कसून चौकशी करीत त्यांना माघारी पाठवले. स्वतः मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

Taj Convention Center
ताज कन्वेन्शन सेंटर

By

Published : Jun 30, 2022, 12:10 PM IST

पणजी : शिवसेनेचे आमदार गोव्यात दाखल झाल्यानंतर ( Shiv Sena rebel MLA in Goa ) पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. रात्रीच्या सुमारास शिवसेनेचे बंडखोर आमदार येणार असल्याच्या सूचना मिळताच काही महाराष्ट्र पासिंगच्या ( Four wheelers of Maharashtra Passing ) गाड्या विशेषतः सिंधुदुर्ग पासिंगच्या ( Sindhudurg Passing ) गाड्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होत्या. यावेळी पोलिसांनी या सर्व गाड्यांची कसून चौकशी करीत त्यांना माघारी पाठवले. कोणताही दगाफटका होऊ नये त्याचप्रमाणे बंडखोर आमदारांच्या जीवाला कोणताही धोका संभवू नये म्हणून गोवा पोलिसांनी योग्य ती खबरदारी घेतली आहे. स्वतः मुख्यमंत्री व राज्याचे गृहमंत्री प्रमोद सावंत ( Goa CM Pramod Sawant ) यांनी परिस्थितीचा आढावा घेऊन पोलिसांना योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना केल्या आहेत.

ताज कन्वेन्शन सेंटर

सीमेवरही कडक पोलीस बंदोबस्त :महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या विशेषतः सिंधुदुर्ग तसेच कारवार भागातून गोवामध्ये येणाऱ्या सीमेवर पोलिसांनी बंदोबस्त कडक केलेला आहे. यानिमित्ताने सर्व वाहनांची कसून चौकशी होते आहे. शिवसेनेचे आमदार गोव्यात येणार असल्यामुळे पोलिसांकडून कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. रात्रीच्या सुमारास शिवसेनेचे बंडखोर आमदार येणार असल्याच्या सूचना मिळताच काही महाराष्ट्र पासिंगच्या गाड्या विशेषतः सिंधुदुर्ग पासिंगच्या गाड्या हॉटेलमध्ये घुसण्याचा प्रयत्न करीत होत्या. महाराष्ट्रातून गोव्यात येणाऱ्या विशेषतः सिंधुदुर्ग तसेच कारवार भागातून गोव्यात येणाऱ्या सीमेवरती पोलिसांनी बंदोबस्त कडक केलेला आहे. यानिमित्ताने सर्व वाहनांची कसून चौकशी होते आहे.

हेही वाचा :BJP Will Claim Power: भाजप करणार सत्तेचा दावा; देवेंद्र फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याची शक्यता

ABOUT THE AUTHOR

...view details