मुंबई -मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात ( Malegaon Blast Case ) राज्य सरकारकडून या प्रकरणाचे तपास केलेले अधिकारी कुलकर्णी यांच्यासह एटीएस अधिकारी यांना दैनंदिन सुनावणी उपस्थित राहण्याचे आदेश राज्य सरकारकडून ( State Government Order To ATS Officer To Present In Court ) देण्यात आले होते. मागील सुनावणीवेळी कोर्टात आलेले एटीएस अधिकाऱ्यांना आरोपी वकिलांकडून विरोध दर्शविल्यानंतर त्यांच्यावर कोर्टातून जाण्याची नामुष्की ली होती. त्यानंतर आज होणाऱ्या सुनावणीदरम्यान लेखी अर्ज घेऊन येणार असल्याचे त्यावेळी एटीएस अधिकार्याने न्यायालयाला सांगितले होते. मात्र, आजदेखील एटीएस अधिकारी अनुपस्थित राहिले आहे.
न्यायालय उद्यापर्यंत तहकूब -
मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी असलेले सुधाकर चतुर्वेदी यांची साक्ष आज न्यायालयासमोर घेण्यात आली. त्यावेळी अनेक मुद्द्यांवर ही साक्ष आज घेण्यात आली. उद्या पुन्हा या साक्षीदारांची साक्ष होणार असून उद्यापर्यंत कोर्ट तहकूब करण्यात आले आहे. उद्या एटीएस अधिकारी पत्र घेऊन येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.