महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

PFI CASE पीएफआय प्रकरणातील संशयित पाच आरोपींच्या एटीएस कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ

वादग्रस्त संघटना पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने (maharashtra ATS) आज एटीएस कस्टडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले होते. या पाच आरोपींच्या एटीएस कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ (ATS custody of five accused in PFI case extended) करण्यात आली आहे.

PFI CASE
पीएफआय प्रकरणातील संशयित पाच आरोपींच्या एटीएस कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ

By

Published : Sep 26, 2022, 8:12 PM IST

Updated : Sep 26, 2022, 8:27 PM IST

मुंबई:वादग्रस्त संघटना पीएफआय (PFI) अर्थात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी संबंधित पाच संशयित आरोपींना महाराष्ट्र एटीएसने (maharashtra ATS) आज एटीएस कस्टडी संपल्याने पुन्हा न्यायालयात हजर केले होते. एटीएसकडून त्यांच्या कोठडीत वाढ करण्यात यावी अशी मागणी केल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयाने या पाच आरोपींच्या एटीएस कोठडीत 3 ऑक्टोबरपर्यंत वाढ (ATS custody of five accused in PFI case extended) करण्यात आली आहे.

या प्रकरणातील सर्व आरोपींना आज न्यायालयात हजर केले असता एटीएसच्या वतीने संदीप गोलसर्विस यांनी असा युक्तिवाद केला की, आरोपींजवळून महत्त्वाचे इलेक्ट्रॉनिक पुरावे जप्त करण्यात आले आहेत. तसेच फोन कॉल रेकॉर्ड देखील तपासात समोर आला आहे. या प्रकरणात आणखी सखोल तपासाकरिता या सर्व आरोपींची 14 दिवसांंकरिता पुन्हा एटीएस कस्टडी वाढवण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.

आरोपींच्या वतीने वकील खान मोहम्मद मुकीन यांनी असा युक्तिवाद केला की, तपास यंत्रणेला मागील पाच दिवसांपासून आरोपींची पोलीस कस्टडी देण्यात आली. आतापर्यंत कुठलाही सबळ पुरावा तपास यंत्रणेकडून उपलब्ध करण्यात आलेला नाही. तसेच तपास यंत्रणेला जे टेलिफोन सी डी आर मिळाले असे सांगत आहेत, या संदर्भात त्यांनी उद्या लेखी सबमिशन कोर्टासमोर करावे. यासंदर्भात आम्ही विशेष न्यायालयासमोर अर्ज देखील केला आहे. कुठल्याही प्रकारचे पुरावे आरोपी क्रमांक पाच कडे मिळाले नाहीत. तसेच ज्या फंडिंगचा संदर्भ तपास यंत्रणा देत आहे ते त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना तीन लाख रुपये दिले होते या संदर्भातील बँक स्टेटमेंट देखील आरोपींच्या वतीने न्यायालयात सादर करण्यात आले आहे.

काय आहे प्रकरण?पीएफआय या संघटनेच्या संबंधित संशयितांविरोधात एनआयए आणि एटीएसनं संयुक्त कारवाई केली आहे. या कारवाईदरम्यान मुंबईतील मालाड, भिवंडी, कांदिवली, पालघर आणि कुर्ला या परिसरामधून संशयित पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यामध्ये मजझर खान, सादिक कुरेशी, असिफ खान, मोहम्मद इकबाल खान आणि मोमीन मिस्त्री या आरोपींचा समावेश आहे. महाराष्ट्र एटीएसने देशविरोधी गतीविधी आणि आयपीसीच्या कलम १२०बी, १२१-ए, १५३-ए आणि यूएपीए कायदा १३(१) अंतर्गत आरोपीना अटक केली आहे.

राज्यातल्या मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद, नांदेड, जळगाव, जालना, कोल्हापूर, बीड, परभणी या जिल्ह्यांत एनआयएनं एटीएसच्या मदतीनं पीएफआयच्या कार्यालयांवर छापे मारले आहेत. त्यात राज्यात पीएफआयशी संबंधित 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. तर देशभरातून आतापर्यंत एकूण 106 जणांना ताब्यात घेतलं आहे. नवी मुंबईच्या नेरुळमध्येही NIA छापेमारी सुरु आहे. सेक्टर 23 मधल्या PFI पीएफआयच्या कार्यालयावर NIA ने छापा टाकला आहे.

Last Updated : Sep 26, 2022, 8:27 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details