मुंबई - मुंबईतील शासकीय महाविद्यालयातील प्राचार्या उर्मिला अतुल परळीकर यांनी वर्गातील अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना अपमानास्पद वागणूक दिली होती. तसेच अपमानास्पद शब्द बोलल्या प्रकरणात आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता (Atrocity case Principal Urmila Parlikar). या गुन्ह्यामध्ये अटकपूर्व जामीनासाठी त्यांनी अर्ज दाखल केला होता. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांचा अर्ज फेटाळून लावला आहे (anticipatory bail rejected). त्यामुळे प्राचार्यांच्या अडचणी वाढल्या आहे. त्यांना कोणत्याहीक्षणी अटक देखील होण्याची शक्यता आहे (Principal Urmila Parlikar can be arrested any time).
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शासकीय शिक्षण महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. ती एसटी जमातीची आहे. तक्रारीनुसार 24 जुलै रोजी वर्ग सुरू असताना महाविद्यालयाच्या प्राचार्या उर्मिला अतुल परळीकर यांनी वर्गाला भेट दिली. तक्रारदाराच्या हस्ताक्षरावर शेरा मारला. प्राचार्यांनी विचारले ती आदिवासी आहे का, तिच्या गावातील शिक्षक अशा पद्धतीने व्याख्याने देतात का. तक्रारदाराने दावा केला आहे की हे अपमानास्पद आहे. वर्गामधील इतर काही विद्यार्थ्यांना देखील संपूर्ण वर्गासमोर त्यांच्या जातीच्या आधारावर अशाच प्रकारे अपमानित केले गेले. बी एड अभ्यासक्रमाच्या प्रथम आणि द्वितीय वर्षात शिकणार्या विद्यार्थ्यांना अपमानित करण्यासाठी प्राचार्यांनी हस्तमैथुन हेल्दी आहे लग्नापूर्वीचे सेक्स हे आरोग्यदायी नाही अशी लिंक पाठवली आहे. तसेच असा दावा करण्यात आला की विद्यार्थ्यांना लिंकशी संबंधित सर्वेक्षणाच्या आधारे रेट केले गेले. ज्या विद्यार्थ्यांना कमी गुण मिळाले त्यांना प्राचार्यांनी स्पष्टीकरणासाठी बोलावले.