महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

किमान '50 ते 60 हजार मतांनी विजयी करू'; अंधेरी पूर्व विधानसभेच्या निवडणुकीवर पटोलेंची प्रतिक्रिया - अंधेरी पूर्व विधानसभेची निवडणुक

अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी मोठे आव्हान आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखालील शिवसेना आपली ताकद दाखवेल. या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. यामध्ये आता काँग्रेसने पाठिंबा दर्शवला आहे.

उद्धव ठाकरे आणि नाना पटोले
उद्धव ठाकरे आणि नाना पटोले

By

Published : Oct 10, 2022, 5:51 PM IST

मुंबई - मुंबईतील अंधेरी पूर्व विधानसभेच्या जागेसाठी 3 नोव्हेंबर रोजी होणारी पोटनिवडणूक उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेसाठी मोठे आव्हान आहे. ज्यात उद्धव ठाकरे यांचे नेतृत्वाखालील शिवसेना आपली ताकद दाखवेल. या लढतीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून दिवंगत आमदार रमेश लटके यांच्या पत्नीला उमेदवारी देण्यात आली आहे. तर, त्यांच्याविरुद्ध एकनाथ शिंदे गट आणि भाजपकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर करण्यात आलेला नाही. अंधेरी पूर्वचे ही जागा शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या मदतीने लढणार आहे. त्या संदर्भात आज काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, आमदार भाई जगताप, आमदार अमित देशमुख यांनी मातोश्रीवर भेट देऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केली आहे.

शिवसेनेला काँग्रेसचा पूर्ण पाठिंबा -या भेटी संदर्भात माध्यमांशी बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व आमदार नाना पटोले म्हणाले की, "महाविकास आघाडीमध्ये ज्या निवडणूका लागतील आणि ज्या पक्षाचा उमेदवार उभा राहिल त्याला आम्ही पाठिंबा देऊ. हा काँग्रेसचा निर्णय झालेला आहे त्या संदर्भात आमची आमच्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांसोबत देखील चर्चा झालेली आहे. काँग्रेस पक्ष अंधेरी निवडणूकिमध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत असणार आहे. याबाबत सोनिया गांधी यांनी भाजपला गप्प करण्यासाठी हे पाऊल उचल आहे. त्यामुळे आम्ही पूर्ण ताकतीने शिवसेनेच्या उमेदवारासाठी प्रचार करू." अशी प्रतिक्रिया नाना पटोले यांनी दिली आहे.

पन्नास ते साठ हजार मतांनी उमेदवार विजयी करू -ही जागा काँग्रेसची आहे. पण, यावेळी तिथले सिटिंग आमदार शिवसेनेचे असल्याने आम्ही सहकार्य करू असा निर्णय आम्ही घेतला आहे. काँग्रेस पूर्ण ताकतीने प्रचार करणार आणि सेनेला 50-60 हजर मतांनी विजयी करू अस पटोले म्हणाले आहेत. अंधेरी पोटनिवडणूकिमध्ये आम्ही पूर्णपणे मदत करू. आज जे काही प्रश्न आहेत ते महत्वाचे आहे. एक अत्याचारी सरकार केंद्र सरकारच्या रूपात आलेलं आहे." अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details