मुंबई -एसटी संपाबाबत ( ST Workers Strike ) अजूनही अंतिम तोडगा निघत नसल्याने आता भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार व परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा ( Gopichand Padalkar criticized Sharad Pawar ) साधला आहे. काल मुंबईमध्ये सह्याद्री अतिथीगृहात एसटी संघटनाचे नेते तसेच परिवहन मंत्री अनिल परब यांची शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली एक बैठकपार ( meeting on st workers strike mumbai ) पडली. या बैठकीमध्ये अंतिम तोडगा निघून संप मिटेल अशी आशा असतानासुद्धा अजूनही संप ताटकळत ठेवला गेला आहे. या कारणावरून आता गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा शरद पवार व अनिल परब यांच्यावर निशाणा साधला आहे.
'दुसऱ्यांची दारं वाजवण्यापेक्षा तुम्ही स्वतः पुढे व्हा' -
परिवहन मंत्री अनिल परब यांना पडळकरांनी सल्ला दिला आहे. ते म्हणतात मंत्री अनिल परब यांनी माझी विनंती सोडा पण आपल्या मुख्यमंत्र्यांच तरी ऐका. इतरांना पुढे करण्याऐवजी तुम्ही स्वत: आझाद मैदानात जा व कर्मचाऱ्यांशी बोला. दुसऱ्याचे दरवाजे ठोठावण्या ऐवजी हा प्रश्न मार्गी लागावा म्हणून स्वत: आझाद मैदानात जाऊन आपल्याच मराठी एसटी कर्मचाऱ्यांशी चर्चा का करत नाहीत? असा प्रश्नही पडळकर यांनी उपस्थित केला आहे. या दरम्यान पडळकर यांनी शरद पवारांचे नाव न घेता परिवहन मंत्र्यांनी पवारांच्या जिवावर राहण्यापेक्षा स्वतः पुढे जाऊन संप मिटवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहनही केले आहे.