मुंबई -जोगेश्वरी ब्रिवरीज प्रा. लि. कंपनीची ( Jogeshwari Breweries Company ) उस्मानाबादच्या ( Osmanabad ) उमरगा एमआयडीसीमधील 45 कोटी 50 लाखांच्या मालमत्तेवर ईडीने ( ED ) आज टाच आणली. उस्मानाबाद मधील उमरगा एमआयडीसीमध्ये ( Umarga MIDC ) हैद्राबाद मुंबई मार्गावर ही कंपनी असून ती सध्या बंद आहे. या कारवाईमध्ये ईडीने फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. कोल्हापूर येथील उमेश शिंदे व देवेंद्र शिंदे हे या कंपनीचे संचालक आहे. मनी लॉंड्रींग कायदा 2002 अंतर्गत कारवाई केली आहे. ईडीच्या धाडीत एकूण 45 कोटी 50 लाखांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. कोल्हापूर येथील उमेश शिंदे व देवेंद्र शिंदे हे या कंपनीचे संचालक आहेत. ईडीने फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. ईडीने ट्विटरवर पोस्ट करुन कारवाईची माहिती दिली आहे.
Jogeshwari Breweries seized By ED : उस्मानाबादच्या जोगेश्वरी ब्रिवरीज कंपनीची 45 कोटींची मालमत्ता ईडीने केली जप्त - ईडी
जोगेश्वरी ब्रिवरीज प्रा. लि. कंपनीची ( Jogeshwari Breweries Company ) उस्मानाबादमधील ( Osmanabad ) उमरगा एमआयडीसी ( Umarga MIDC ) येथील 45 कोटी 50 लाखांची मालमत्ता ईडीने आज जप्त केली आहे. या कारवाईमध्ये ईडीने ( ED ) फॅक्टरिची मालमत्ता आणि मशिनरी जप्त केली आहे. कोल्हापूर येथील उमेश शिंदे व देवेंद्र शिंदे हे या कंपनीचे संचालक आहे.
कंपनी कायद्यातर्गतही जोगेश्वरी ब्रिव्हरेज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीची 5 मार्च 2009 रोजी नोंदणी केली आहे. त्यानुसार 15 कोटी हे या कंपनीची नोंदणी करतानाचे शेअर कॅपिटल आहे तर पेड कॅपिटल हे 2 कोटी आहे. या कंपनीच्या संचालक मंडळाची शेवटची बैठक ही 30 नोव्हेंबर 2021 रोजी झाली असून 31 मार्च 2021 पर्यंतचे ऑडिट लेखापरीक्षण करण्यात आले आहे. मिनिस्ट्री ऑफ कॉर्पोरेट अफेयर्स या अंतर्गत याची नोंदणी असून दारू निर्मिती हा उद्देश आहे. ही कंपनी दारू निर्मिती क्षेत्रात काम करीत असून गेली 5 ते 6 वर्षांपासून या ठिकाणचे काम बंद आहे.
हेही वाचा -Mirchi Baba: 'काली' चित्रपटावरुन मिर्ची बाबा भडकले; म्हणाले, यांचा शिरच्छेद करणाऱ्याला 20 लाख देणार