महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Jul 3, 2022, 6:36 PM IST

Updated : Jul 3, 2022, 7:14 PM IST

ETV Bharat / city

Assembly Speaker Election : 'शिवसेनेच्या बंडखोर 39 आमदारांना निलंबित करा; विधानसभा अध्यक्षांना पत्र'

विधानसभा अध्यक्षांची निवड करण्यात आली. या निवडणुकीत शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी भाजपच्या उमेदवाराला मतदान केलं. त्याविरोधात 39 आमदारांचे निलंबन करावे, अशी तक्रार विधानसभा अध्यक्षांना दिल्याची माहिती भास्कर जाधव यांनी दिली.

bhaskar jadhav
bhaskar jadhav

मुंबई -विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक ( Assembly Speaker Election ) पार पडली आहे. राहुल नार्वेकर विधानसभेचे नवे अध्यक्ष ( Rahul Narwekar Assembly Speaker ) झाले आहेत. मात्र, या निवडणुकीपूर्वी शिवसेनेनं आमदारांना व्हीप बजावला होता. तो व्हीप मोडल्यामुळे 39 सदस्यांना निलंबीत करण्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती शिवसेनेचे आमदार भास्कर जाधव यांनी दिली आहे.

याबद्दल भास्कर जाधव म्हणाले की, शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी अखेर आज ( 3 जुलै ) विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराला मतदान केले आहे. याबद्दल शिवसेनेचे गटनेते अजय चौधरी यांनी विधानसभा अध्यक्षांकडे तक्रार दाखल केली आहे. ही तक्रार देऊन अध्यक्षांना सांगितले की हे सर्व माझ्या समोर घडले आहे, असे जाधव यांनी म्हटलं आहे.

भास्कर जाधव यांच्याशी संवाद साधताना प्रतिनिधी

'पुर्वीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका' - लोकशाहीच्या पद्धतीने निवडणूक झाली. पण, विधानसभेच्या नियमानुसार, पक्षाने जो व्हीप बजावला होता, त्या व्हीपच्या विरोधात 39 आमदारांनी मतदान केलं आहे. आम्ही सर्व आमदारांच्या नावानिशी तक्रार अध्यक्षांकडे केली आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये आम्ही आधीच याचिका दाखल केली आहे. आधीच 16 आमदारांविरोधात अपात्रतेची याचिका दाखल केली आहे. त्यावर आता सुनावणी होणार आहे, अशी माहिती शिवसेनेचे प्रतोद सुनील प्रभू यांनी दिली.

"शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार" - सभागृहातून बाहेर आल्यानंतर आदित्य ठाकरेंनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, बंडखोर आमदारांपैकी एकही जण माझ्या नजरेला नजर भिडवू शकत नाही. इथे त्यांची ही अवस्था आहे, तर ते आपल्या मतदारसंघात गेल्यावर शिवसैनिकांना कसे सामोरे जाणार. आता या बंडखोर आमदारांना सुरक्षाव्यवस्थेसह बसमधून नेले जाते. पण, हे किती दिवस चालणार? आज हे सर्वजण नैतिकतेच्या चाचणीत अपयशी ठरले आहेत, असेही आदित्य ठाकरे यांनी म्हटले.


निवडणुक पद्धतीवर आक्षेप:विधिमंडळ अधिवेशनाचे कामकाज सकाळी 11 वाजता सुरु झाले. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नवनिर्वाचित आमदारांची सभागृहाला ओळख करुन दिली. मतदानासाठी राहुल नार्वेकर यांचा प्रस्ताव भाजपने सादर केला. त्यानंतर आवाजी पद्धतीने मतदान झाले. त्यात नार्वेकर यांना बहुमत मिळाल्याचे चित्र होते. मात्र, आवाजी मतदान पद्धतीलाच मविआने आक्षेप घेतला. त्यामुळे आमदारांची शिरगणती करुन अध्यक्ष निवडला गेला. या प्रक्रियेसाठी विधानसभेच्या सभागृहाचे दरवाजे प्रक्रीया संपेपर्यंत दरवाजे बंद करण्यात आले होते महाविकास आघाडीने सरकारस्थापनेच्या वेळी याच पध्दतीचा अवलंब केला होता. तेव्हा भाजपने त्यावर आक्षेप घेतला होता. या संदर्भात न्यायालयात याचिकाही दाखल आहे. हेच कारण सांगुन राज्यपाल मधल्या काळात नव्या अध्यक्षाच्या निवडीला परवाणगी देत नव्हते मात्र यावेळी पुन्हा त्याच आक्षेपार्ह पध्दतीवर आक्षेप आहे.

गोगावले यांची ठाकरे गटा बद्दल तक्रार:शिवसेनेचा व्हीप पाळला गेला नाही अशी तक्रार असताना शिंदे गटाकडून प्रतोद भरत गोगावले यांनी व्हीपविरोधात मतदान करणाऱ्या शिवसेनेच्या १६ आमदारांविरोधा तक्रार दाखल केली आहे. शिंदे गटाकडून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना त्या संदर्भात पत्र दिले आहे. अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रात भरत गोगावले यांचा शिवसेनेचे प्रतोद असा उल्लेख करण्यात आला आहे. विधानसभा अध्यक्षांनी गोगावले यांच्या पत्राचे वाचन केले आणि महाविकास आघाडीच्या आक्षेपा सोबतच गोगावलेचे पत्रही कामकाजात पटलावर आनले.

शिवसेनेकडून शिंदे गटाची तक्रार: विधानसभा अध्यक्षांची निवडवणूक जाहीर होताच विधीमंडळाचे शिवसेनेचे पक्ष प्रतोद सुनील प्रभू यांनी एकनाथ शिंदे यांच्यासह सर्व आमदारांना व्हीप जारी केला होता. महाविकास आघाडीचे उमेदवार राजन साळवी यांनाच सर्वांनी मतदान करावे, असा व्हीप आमदारांना देण्यात आला होता. व्हीप जारी केल्याने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आक्रमक झाले. आमच्याकडे बहुमत असल्याने सुनील प्रभू यांनी जारी केलेला व्हीप आम्हाला लागू होत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी दिली मात्र कोणाचा व्हीप खरा हा कळीचा मुद्दा म्हणुन समोर आला.

हेही वाचा -Aaditya Thackeray : 'अडीच वर्षाआधी फडणवीसांनी कानात सांगितले असते तर...'; आदित्य ठाकरेंचा उपमुख्यमंत्र्यांना टोला

Last Updated : Jul 3, 2022, 7:14 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details