मुंबई : शिवसेनेकडून राजन साळवी यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा ( Assembly Speaker election 2022 ) अर्ज भरला आहे. तर, भाजपकडून राहुल नार्वेकर ( Rahul Narvekar ) यांनी विधानसभा अध्यक्षपद निवडणुकीसाठी अर्ज दाखल केला आहे. शेवटच्या क्षणी काँग्रेसकडून एक किंवा दोन अर्ज दाखल केले जातील असे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Congress State President Nana Patole ) यांनी म्हटले होते. पण अखेरच्या क्षणी काँग्रेस, राष्ट्रवादीने शिवसेनेचे उमेदवार राजन साळवी ( MVA Speaker Election Candidate Rajan Salvi ) यांना पाठिंबा देण्याचे ठरवले असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सांगितले आहे.
Assembly Speaker Election 2022 : विधानसभा अध्यक्षपद निवडणूक, महाविकास आघाडीकडून राजन साळवी मैदानात - काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले
विधानसभा अध्यक्षांच्या ( Assembly Speaker Election 2022 ) निवडीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहे. याबाबत महाविकास आघाडीकडून राजन साळवी यांना पाठिंबा दिला असल्याचे माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी सांगितले.
विधानसभा अध्यक्ष निवडणुक -विधानसभा अध्यक्ष पदाच्या निवडणुकीचा प्रश्न लवकरच मार्गी लागणार( assembly speaker election ) आहे. दरम्यान, सध्या राज्यात शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) भाजप यांचे नवीन सरकार स्थापन झाले असले तरी, गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेचा विषय ठरलेल्या विधानसभा अध्यक्षांच्या ( assembly speaker election ) निवडीचा प्रश्न लवकरच होणार आहे. जानेवारी २०२१ रोजी काँग्रेस नेते प्रदेशाध्यक्ष नाना पटोले ( Maharashtra assembly speaker election ) यांनी विधानसभा अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तेव्हापासून हे पद रिक्त आहे. मात्र, यावरून काँग्रसने आता आक्रमक पवित्रा धारण केला असून राज्यपाल भगतसिंह कोश्यारी ( Governor Bhagat Singh Koshyari ) यांना लक्ष्य केले आहे. विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसंदर्भात आपण जवळपास तीन वेळा राज्यपालांची भेट घेत निवडणूक घेण्याची मागणी केली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयातील याचिकेचे कारण देत त्यांनी ही परवानगी नकारली होती. मग, आता विधानसभा अध्यक्षांच्या निवडीसाठी इतकी घाई का, असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat ) यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपालांनी दिलेल्या पत्राचाच आधार? -राज्य विधिमंडळाचे दोन दिवसीय विशेष अधिवेशन उद्या, ३ आणि सोमवारी ४ जुलै रोजी बोलविण्यात आले आहे. या अधिवेशनात नव्या शिंदे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असून, त्याबरोबरच विधानसभा अध्यक्षांची निवडदेखील केली जाणार आहे. महाविकास आघाडी सरकार असताना विधानसभा अध्यक्ष निवडीसाठी राज्यपालांनी परवानगी नाकारली होती. त्या संदर्भातील पत्रही दिले होते. याच पत्राचा आधार घेऊन काँग्रेसने आता राज्यपालांवर टीका केली आहे. या सर्व प्रकरणात लोकशाहीची आणि राज्यघटनेची थट्टा झाल्याचा आरोप थोरात यांनी केला आहे.
हेही वाचा -मुंबईत शिवसेनेचा पराभव करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पद - संजय राऊत