मुंबई -आजपासून विधानसभेच विशेष अधिवेशन सुरु ( Assembly Session 2022 ) झालं आहे. दोन दिवस चालणाऱ्या अधिवेशनात राहुल नार्वेकर यांची विधानसभा अध्यक्षांची ( Rahul Narwekar Assembly Speaker ) निवड करण्यात आली आहे. त्यापूर्वी राहुल नार्वेकरांना मतदान करताना शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना राष्ट्रवादी, काँग्रेसकडून टोमणे मारण्यात ( Oppostion MLA Taunt Rebel Shivsena MLA ) आले. "काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल" तसेच, आमदार प्रताप सरनाईक ( Pratap Sarnaik ), यामिनी जाधव ( Yamini Jadhav ) या मतदानासाठी उभारले असता 'ईडी-ईडी' म्हणून चिमटे काढण्यात आले.
विधानसभा अध्यक्षाची निवड करण्यासाठी राहुल नार्वेकर यांच्या बाजूने मतदान करणाऱ्या भाजप आणि शिवसेनेचे बंडखोर आमदार यांना उभे राहून आपलं नाव आणि क्रमांक सांगायचे होता. मात्र, बंडखोर आमदारांपैकी ज्यावेळेस आमदार प्रताप सरनाईक आणि यामिनी जाधव आपलं नाव सांगण्यास उभे राहिले, तेव्हा विरोधी बाकावरून 'ईडी-ईडी' म्हणत त्यांना चिमटे काढण्यात आले. तर, आमदार शहाजी बापू पाटील ( Shahaji Bapu Patil ) हे आपलं नाव सांगण्यास उभे राहिल्यास विरोधी बाकावरून जवळपास सर्वांनी 'काय झाडी, काय डोंगर, काय होटेल' असं म्हणत त्यांना चिमटे काढले. तसेच, तिथेच अपक्ष आमदार रवी राणा हे आपलं मत नोंदवण्यासाठी विधानसभेत उभे राहिल्यानंतर 'हनुमान चालीसा' असा उच्चार विरोधकांकडून करण्यात आला.