महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

आघाडीमधील जागा वाटपाचा विषय लवकरच मार्गी लागेल - शेकाप - political news

आघाडीत कोणाला किती जागा व कोणती जागा देणार यावर असूनही साशंकता आहे. यासर्व विषयांवर शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी...

शेकाप अध्यक्ष जयंत पाटील

By

Published : Sep 26, 2019, 11:12 AM IST

मुंबई- विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले आहेत. त्यामुळे प्रचाराला आता चांगलाच जोर आला आहे. आघाडीत कोणाला किती जागा व कोणती जागा देणार यावर अद्यापही साशंकता आहे. यासर्व विषयांवर शेकापचे अध्यक्ष जयंत पाटील यांच्यासोबत संवाद साधलाय ईटीव्ही भारतचे प्रतिनिधी संजीव भागवत यांनी...

प्रश्न :आघाडीच्या संदर्भात आपली काय भूमिका ठरलेली आहे. आघाडीमध्ये आपल्याला किती जागा जातील?

उत्तर : आमच्या आघाडीचा जागावाटपात 90 टक्के विषय मार्गी लागला आहे. कालच(मंगळवारी) राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, जितेंद्र आव्हाड आदी नेत्यांसोबत आम्ही बैठक केली. यात सीपीएम, सीपीआय, जनता दल अशा पक्षाचे लोक होतो. राज्यात आघाडीच्या जागावाटपात कुठेही अडचण येणार नाही, असे मला वाटते. आम्ही सर्वच पक्ष मिळून प्रत्येक मतदारसंघांमध्ये विजय कोणाचा होईल, त्याची जनमानसामध्ये काय परिस्थिती आहे, याचे अवलोकन आम्ही करत आहोत.

शेकाप अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात....

हेही वाचा - गांधी १५० : चिराला-पिराला आंदोलन, आणि गांधीजींची तुटलेली काठी...

प्रश्न : वंचित आघाडीचे प्रमुख अॅड. प्रकाश आंबेडकर हे सांगत आहे की, आमच्याकडे एक डाव्या पक्षांचा गट येत आहे, तर हा गट नेमका कोणता आहे?

उत्तर : अशी परिस्थिती मला तरी दिसत नाही. आघाडीमध्ये जे गट आले ते आहेत. इतर घटक पक्षांची संख्याही आता आघाडीत वाढत आहे. काही पक्षांना जागा मिळत नाही, तरीसुद्धा ते आघाडीबरोबर आहेत. त्यामुळे तशी काही परिस्थिती निर्माण झालेले असेल असे मला वाटत नाही.

प्रश्न : शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी आपल्याला अधिक जागा हव्यात असे सांगत नुकतेच वेगळे लढण्याची चर्चा करत आहेत, इतकेच नव्हे तर आमदार बच्चू कडू हेही अशीच भूमिका घेत आहेत, याबद्दल नेमकी वस्तुस्थिती काय आहे?

उत्तर : आघाडीमध्ये बच्चू कडू यांना घेतले पाहिजे, अशी आमची भूमिका आहे. त्याचप्रमाणे बहुजन विकास आघाडीचे प्रमुख हितेंद्र ठाकूर यांनीही चांगल्या प्रकारची भूमिका घेतलेली आहे. त्यामुळे आघाडी आज भक्कम होत आहे. आज आघाडीबरोबर आमचे विद्यमान जे आमदार आहेत त्यांची संख्या ११ पर्यंत आहे. यात बच्चू कडूसोबत सीपीएम, समाजवादी पक्ष असतील आज विविध पक्षांचे आमदार आहेत.

शेकाप अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात....

हेही वाचा - माध्यम सम्राट रामोजी राव 'आयबीसी इनोव्हेशन अवॉर्ड २०१९' या पुरस्काराने सन्मानित

प्रश्न : राज्यात शेतकरी आणि त्यांचे इतर असंख्य प्रश्न असताना सरकार मात्र या निवडणुकीसाठी 370 कलमाचा आधार घेत असताना दिसते, त्याबद्दल काय सांगाल ?

शेकाप अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात....

उत्तर : 370 चा प्रश्न मोठा आहे असं मला वाटत नाही. या कलमाच्या माध्यमातून काश्मीरमध्ये असलेल्या लोकांना याआधीच सवलती देण्यात आलेल्या होत्या. त्या नेहरू आणि इंदिरा गांधी त्यांच्या काळातच सवलती देण्यात आल्या होत्या. नंतर त्या कमी करण्यात आल्या. आताच्या निर्णयामुळे केवळ त्या ठिकाणी इतर राज्यातील लोकांना जागा घेता येणार आहे. बाकी त्यात काही वेगळं नाही.

भाजपचे लोक जाणीवपूर्वक नवीन वेगळे काहीतरी केल्याचा एक बाऊ करतात आणि तशी परिस्थिती निर्माण करतात. आज पण मी सांगतो 370 कलमाचा मुद्दा महाराष्ट्रात निवडणुकीसाठी होऊ शकत नाही. आज राज्यामध्ये पाणी मिळत नाही. अनेक ठिकाणी भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. एका ठिकाणी पाऊस पडतो तर दुसरीकडे कोरडाठाक भाग आहे. असे विविध प्रश्न राज्यात आहेत आणि त्या प्रश्नाचे उत्तर सरकारने दिले पाहिजे. परंतु ज्या घोषणा केल्या त्या घोषणा पूर्ण झाल्या नाहीत.

शेकाप अध्यक्ष जयंत पाटील म्हणतात....
छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने स्मारक उभे करण्याचा विषय झाला, तो झाला नाही. राज्यातील शेतकऱ्यांची सरसकट कर्जमाफी करतो म्हणून सांगितलं ती पण झाली नाही. आदिवासींच्या जमिनीचे पट्टे नावावर करून देतो म्हणून सरकारने आश्वासन दिले. तेही सरकारने पाळले नाही. सीपीआयच्या नेतृत्वाखाली मोर्चा निघाला लाखो लोक त्यामध्ये सामील झाले. परंतु या सरकारने दिलेले कोणतेही आश्वासन पूर्ण केलेले दिसत नाही. त्यामुळे आमचीे ही लढाई आहे. त्यामुळे यात काही प्रश्न येणार नाही. आम्ही लढत राहू. परंतु एक दिवस या राज्यात खरं बोलणाऱ्याचे सरकार येईल एवढा मी सांगतो.

ABOUT THE AUTHOR

...view details