महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Rahul Narvekar शिवसेना शिंदे गट कामकाज सल्लागार समिती वाद विधानसभा अध्यक्षांचे स्पष्टीकरण म्हणाले

विधानसभा कामकाज सल्लागार समितीत बंडखोर शिंदे गटाला स्थान दिल्याने शिवसेनेने यावर आक्षेप घेतला. त्यावर स्पष्टीकरण देताना माझ्यासमोर दोन वेगळ्या गटाचा दावा कोणी केला नाही, तसं झाल्यास विचार करू, असे राहुल नार्वेकर यांनी म्हटलं rahul narvekar over shivsena shinde group आहे.

Rahul Narvekar
Rahul Narvekar

By

Published : Aug 12, 2022, 3:33 PM IST

मुंबई - राज्य विधानसभा कामकाज सल्लागार समितीत बंडखोर शिंदे गटाला स्थान दिल्याने शिवसेनेने यावर आक्षेप घेतला. कामकाज समितीवर नियमानुसार सदस्य दिले जातात. नियमबाह्य काम होत नाहीत. माझ्यासमोर दोन वेगळ्या गटाचा दावा कोणी केला नाही, तसं झाल्यास विचार करू, असे स्पष्टीकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी केले. विधानभवनात ते बोलत rahul narvekar over shivsena shinde group होते.

विधानसभेच्या कामकाज सल्लागार समितीत ठाकरेंच्या शिवसेनेला स्थान दिले नाही. शिंदे गटाच्या सदस्यांना या समितीत स्थान दिल्याने शिवसेनेने राज्य विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, विधिमंडळ सचिवालयाकडे लेखी पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे कामकाज सल्लागार समितीमध्ये सहभागी न केल्याने सध्या वाद सुरू झाला आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी खुलासा केला.

विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर प्रसारमाध्यमांशी बोलताना

विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीचे काम नियमानुसार होत आहे. बीएसी नियमानुसारच समिती गठित झाली. पक्षाच्या ताकदीनुसार त्यांचे प्रतिनिधी नेमले जातात. प्रत्येक पक्षाकडून नाव मागवण्यात आली होती. काँग्रेस, राष्ट्रवादी, भाजप आणि शिवसेनेकडून प्रत्येकी दोन नाव आली. शिवसेनेचे विधिमंडळातील एकनाथ शिंदे गटनेते आहेत आहेत. त्यांच्याकडून जी नाव मिळाली त्यांना सहभागी केले, असे नार्वेकर म्हणाले.

अजय चौधरी यांच्या पत्राबाबत नार्वेकर यांनी म्हटलं की, नियमानुसार विधिमंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी ३ जुलै २०२२ ला पत्र दिले. त्यांनी उल्लेख केला गट नेता स्वतः ते आहे. नियमानुसार शिंदे यांचे पत्र ग्राह्य आहे. शिवसेनेकडून दोन वेगळे गट आहे, असा कोणी दावा केलेला नाही. त्यामुळे माझ्यासमोर शिवसेना विधिमंडळ एक दिसत आहे. तर दोन वेगवेगळ्या नेत्यांचे कसे ऐकले जाईल. काही गोष्टी न्यायप्रविष्ट आहेत. विधिमंडळ त्याचे काम करत. विधीमंडळ कामकाजामध्ये न्यायालय हस्तक्षेप करत नाही. न्यायालय विधिमंडळ कामकाजाला स्थगिती देऊ शकत नाही. अजूनही कसली स्थगिती नाही. कोणतेही नियमबाह्य काम केले नाही. गटनेता कोण हे आम्ही ठरवत नाही. गटनेता कोण हे आम्हाला कळवले जाते, असे नार्वेकर यांनी स्पष्ट केलं आहे.

हेही वाचा -Election Commission शिवसेनेची ती मागणी निवडणूक आयोगाने फेटाळल

ABOUT THE AUTHOR

...view details