मुंबई :राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्टून समाजमाध्यमांवर टाकल्याने नाराज झालेल्या शिवसैनिकांनी माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांना मारहाण केली. या प्रकरणी मारहाण करणाऱ्यांना जामीनही मिळाला असल्याने त्यांच्या निषेधार्थ दादर येथील शिवसेना भवन समोर भाजपच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली. यावेळी शिवसेनेला 'ईंट का जबाब पत्थरसे देऊ' अशा इशारा भाजपने दिला आहे.
कांदिवली येथे राहणारे माजी नौदल अधिकारी मदन शर्मा यांनी व्हाटसअॅपवर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेना पक्षाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे कार्टून असलेला फोटो पाठवला होता. यामुळे संतप्त झालेल्या शिवसैनिकांनी शर्मा यांच्या इमारतीखाली जाऊन त्यांना मारहाण केली होती. या मारहाणीचा सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. त्याचवेळी मारहाण करणाऱ्यांना अटक करण्यात आली. मात्र, दुसऱ्याच दिवशी त्यांची जामिनावर सुटका झाली आहे.