मुंबई -अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने एका रुग्णाने एका नर्सवर प्राणघातक हल्ला केला. दक्षिण मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात ही घटणा घडली. रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह होता. तो उपचारासाठी एलिझाबेथ रुग्णालयात दाखल झाला होता. मात्र मला आयसीयूमध्ये दाखल करा, अशी मागणी त्याने केली. या मागणीची पूर्तता न झाल्याने त्याने थेट तिथे उपस्थित असलेल्या एका नर्सवर प्राणघातक हल्ला केला.
मुंबईत रुग्णाकडून परिचारिकेवर प्राणघातक हल्ला - corona in mumbai
अतिदक्षता विभागात दाखल न केल्याने एका रुग्णाने एका नर्सवर प्राणघातक हल्ला केला. दक्षिण मुंबईतल्या एलिझाबेथ रुग्णालयात ही घटणा घडली.
मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात-
ही घटना 16 एप्रिलची आहे. 13 एप्रिल रोजी हा तरुण एलिझाबेथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाला होता. 15 एप्रिल रोजी त्याची ऑक्सिजन लेवल काहीशी खालावली. 'मला आयसीयूमध्ये दाखल करा अशी तो मागणी करू लागला'. मात्र या मागणीची पूर्तता न झाल्याने त्यानं नर्सवर हल्ला केला. हाल्ल्यानंतर त्यानं तिथून धूम ठोकली. रुग्णालय प्रशासनाने घडला प्रकार पोलिसांना कळवला. पोलिसांनी त्या आरोपीचा शोध घेत त्याला ताब्यात घेतलं. त्याच्यावर मेस्मा अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या रुग्णावर आयपीसी अंतर्गत 324,504,188,270 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलाय. सध्या हा रुग्ण कोविड पॉझिटिव्ह असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत. कोरोनामुक्त झाल्यानंतर त्याच्यावर कारवाई केली जाणार, असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते.
हेही वाचा -डॉ. झाकीर हुसेन हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन गळती, 61 रुग्णांची प्रकृती गंभीर