महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Aslam Shaikh On Omicron : लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा- अस्लम शेख - Mumbai Airport

ओमायक्रॉनचा सर्वात जास्त धोका लहान मुलांना (Omicron Threat To Childrens) असल्याची शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवली जात आहे. मात्र असे असले तरी, केंद्राने लहान मुलांच्या लसीकरणाबाबत (Centers Decision Children Vaccination) अद्यापही निर्णय घेतलेला नाही. केंद्र का विलंब लावत आहे, असा सवाल मुंबईचे पालकमंत्री असलम शेख (Mumbai Gaurdian Minister Aslam Shaikh) यांनी उपस्थित केला आहे.

अस्लम शेख
अस्लम शेख

By

Published : Dec 9, 2021, 6:11 PM IST

मुंबई -ओमायक्रॉनचा पहिला रुग्ण महाराष्ट्रात (Omicron First Patient Maharashtra)आढळला, तेव्हापासूनच राज्य सरकार ओमायक्रॉनबाबत गंभीर आहे. मुंबई विमानतळावर जगभरातून प्रवासी येत असतात. हे प्रवासी मुंबईतल्या विविध भागांसह राज्यातल्या विविध शहरांमध्ये जात असतात. या प्रवाशांवर नजर ठेवून त्यांच्यासाठी कॉल सेंटरच्या माध्यमातून सुविधा देण्याचा प्रयत्न सरकारच्यावतीने करण्यात आला आहे. मुंबईतील सर्व वार्डमध्ये 24 तास कॉल सेंटर चालविण्यात येत असून, त्याद्वारे लक्ष ठेवण्यात येत आहे. ओमायक्रॉनचे रूग्ण वाढल्यास जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांची (Genome Sequencing Tests) केंद्र वाढवण्याचा निर्णय महापालिकेच्या मदतीने घेण्यात येईल, अशी माहिती मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख (Mumbai Gaurdian Minister Aslam Sheikh) यांनी दिली आहे. ओमायक्रॉनबाबत राज्य सरकार गंभीर असून, यावर लक्ष ठेवून आहे. जर रुग्ण वाढले तर त्यादृष्टीने त्या- त्या वेळेस निर्णय घेतले जातील. मात्र अद्याप तशी परिस्थिती नसल्याने, कठोर निर्बंध लादण्यात आलेले नाहीत असंही त्यांनी स्पष्ट केले.

लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राने तातडीने निर्णय घ्यावा- अस्लम शेख
लहान मुलांच्या लसीकरणाबाबत केंद्राने निर्णय घ्यावामुंबईतील शाळा जरी १५ डिसेंबरपर्यंत बंद असल्या तरी, लहान मुलांचे लसीकरण होणे गरजेचे आहे. राज्य सरकार लसीकरण करण्यास तयार आहे. मात्र, त्यासाठी केंद्राची परवानगी लागते आणि केंद्र याबाबतीत का विलंब लावते आहे, ते केंद्राने स्पष्ट करावे, असेही शेख यांनी यावेळी सांगितले.

ABOUT THE AUTHOR

...view details