मुंबई -कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद असलेल्या राज्यातील आदिवासी विभागांतर्गत ( Tribal Department ) येणाऱ्या शासकीय अनुदानित आश्रमशाळा ( Government Ashram School Reopen ) आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूल इयत्ता पहिली ते चौथीचे वर्ग ( Class I to IV ) बुधवार १५ डिसेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. राज्यातील आश्रमशाळा अनुदानित आश्रमशाळा आणि एकलव्य मॉडेल रेसिडेंशियल स्कूलमध्ये ( Eklavya Model Residential School ) २ ऑगस्ट २०२१ पासून आठवी ते बारावी पर्यंतच्या वर्गांना सुरू करण्याची मान्यता देण्यात आली होती. त्यानंतर राज्यातील कोरोनाची आटोक्यात आलेली परिस्थिती पाहता ४ ऑक्टोबर २०२१ पासून स्थानिक परिस्थितीचा विचार करून पाचवी ते सातवी पर्यंतच्या शाळा सुरू करण्यास मान्यता देण्यात आली होती. तर आता १५ डिसेंबर २०२१ पासून पहिली ते चौथीचे वर्ग सुरू करण्यात येतील, असे परिपत्रक शासनाने ( Government Circular ) जारी केले आहे.
- शाळा सुरू करण्यामागची पार्श्वभूमी
मागील वर्षी शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान झाले आहे. वर्षभरात विविध माध्यमातून प्रत्येक मुलांपर्यंत शिक्षण पोहोचवण्याचा प्रयत्न शासनाच्यावतीने करण्यात आला. मात्र शाळा बंद असल्यामुळे मुले एक वर्षापासून घरी आहेत. त्यामुळे त्यांच्यावर शारीरिक, मानसिक तणाव येऊन दुष्परिणाम होत असल्यामुळे या बाबीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, असे सरकारचे मत आहे. मुलांच्या अध्ययनात खंड पडल्यामुळे मुला मुलींचे गळतीचे प्रमाण वाढले असून बालविवाह, बाज बालमजुरीचे प्रमाण वाढल्यामुळे सामाजिक नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करत आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने खबरदारी घेत शाळा सुरू करण्यात याव्या, असा निर्णय सरकारने घेतला आहे.
- 'चला मुलांनो शाळेत चला'