मुंबई -राज्यातील आमदारांसाठी मुंबईत ३०० घरे बांधण्याचा ( 300 House For MLA ) निर्णय राज्य सरकारकडून घेतल्यानंतर त्यावर जोरात टीका करण्यात आली. या टीकेमध्ये सर्वपक्षीय नेत्यांचा व सामान्य जनतेचा समावेश होता. यानंतर या बाबत घुमजाव करताना राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड ( Jitendra Awhad ) यांनी स्पष्टीकरण देताना आमदारांना ही घरे मोफत दिली जाणार नसून त्यांच्याकडून जागेची व बांधकामाची किंमत वसूल करण्यात येणार असल्याचे सांगितले व या घरांचा अपेक्षित खर्च ७० लाख ते १ कोटी रुपयापर्यंत असणार असं सांगितलं. परंतु राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण ( Ashok Chavan On MLA House ) यांनी असा कुठलाही प्रस्ताव वा अशी कुठलीही आमदारांची मागणी नसल्याचे सांगितल्याने या संपूर्ण प्रकरणाचा फुसका बार उडाला आहे.
मागणी नसताना मुंबईत घरे कशासाठी -राज्यातील आमदारांना ती मुंबई 300 घरे देण्याचा निर्णय सर्वस्वी फक्त राष्ट्रवादी कॉंग्रेसकडून किंवा त्यांच्या ठराविक मंत्र्या कडूनच करण्यात आला का? हा प्रश्न आता उपस्थित होत आहे? कारण याबाबत महाविकास आघाडी सरकार मध्येच एकमत नव्हतं. आमदारांना मोफत घरे देण्याच्या निर्णयावर सोशल मीडियावर सर्वसामान्य नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया दिल्या होत्या. त्याचबरोबर मनसे आमदार राजू पाटील, काँग्रेस आमदार प्रणिती शिंदे यांनी सुद्धा घर घेण्यास नकार दिला होता. त्यानंतर ही घरं ग्रामीण भागातील आमदारांना देण्याचं ठरलं. परंतु या सर्व प्रकरणावर मोठ्या प्रमाणामध्ये सरकारविरोधात हल्लाबोल झाल्यानंतर खासदार नवनीत राणा, शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुद्धा या निर्णयाबाबत असमर्थता दर्शवली होती.
काँग्रेसचा या मागणीला स्पष्ट शब्दात नकार -याबाबत सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी फार मोठे वक्तव्य केले आहे. कामगारांना मोफत घरे देणार असा कुठलाही निर्णय झाला नव्हता, असे वक्तव्य चव्हाण यांनी केले आहे. त्याचबरोबर अशा पद्धतीची मागणी ही कुठल्याही आमदाराने केली नव्हती. त्यामुळे या निर्णयावर अंमलबजावणी करण्याचा प्रश्नच येत नाही, असे सांगत त्यांनी महाविकास आघाडी सरकारला घरचा आहेर दिला आहे. वास्तविक गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित स्थान केले आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर निरर्थक आरोप केले, असेही ते म्हणाले. परंतू वास्तविक पाहता हा निर्णय खुद्द गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभेत घेतला असल्याचं स्पष्ट असल्याने आत्ता हाच निर्णय त्यांच्या अंगाशी येणार असे दिसत आहे.