मुंबई - प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने नांदेड येथे झालेल्या कार्यक्रमात आपण महाविकास आघाडीतील कोणत्याही पक्षाच्या विरोधात वक्तव्य केले नाही. परंतु माझ्या त्या विधानाचा विपर्यास करण्यात आला. त्या संदर्भातील ज्या बातम्या छापून आल्या त्या बातम्या वस्तुस्थितीला धरून नाहीत, असा खुलासा सार्वजनिक बांधकाम मंत्री व काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी मुंबईत केला.
सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांची प्रतिक्रिया... हेही वाचा... 'हिंमत असेल तर भाजपने महाविकास आघाडीचे सरकार बरखास्त करून दाखवावे'
'मी तीनही पक्षांच्या किमान समान कार्यक्रमाबाबत बोललो होतो. तीनही पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम तयार केला आहे. तो लिखित दस्तावेज आहे. मी जे बोललो ते त्या अनुषंगाने होते. मात्र त्या विधानाबाबत ज्या बातम्या आल्या, ती वस्तुस्थिती नाही. मी कोणाच्याही विरोधात बोललेलो नाही. आमचे सरकार उत्तम चालले आहे. हम साथ साथ है', असे विधान करून महविकास आघाडी भक्कम असल्याचे अशोक चव्हाण यांनी स्पष्ट केले.
हेही वाचा... कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'
मुनगंटीवार यांचे राज्यातील सरकारबाबतची स्वप्ने म्हणजे.. 'मुंगेरीलाल के हसीन सपने'
कोरेगाव-भीमा या प्रकरणाचा तपास 'एनआयए'कडे दिल्या संदर्भात अशोक चव्हाण यांना विचारले असता, त्यांनी अशा पद्धतीने महाराष्ट्रात हस्तक्षेप व्हावा हे योग्य नसल्याचे म्हटले आहे. कोरेगाव-भीमा संदर्भात फेरआढावा घेण्याची आवश्यकता असल्याचे, महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले होते. पण त्यानंतर लगेच दोन दिवसात केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास एनआयएकडे दिला, हे योग्य नाही. त्यासाठी महाराष्ट्राची सहमती घ्यायला हवी होती. किमान चर्चा तरी करायला हवी होती, असे चव्हाण यांनी म्हटले. तसेच केंद्र आणि राज्यामध्ये समन्वय राहिला नाही, तर राज्यांना काम करणे कठीण होईल. राष्ट्रपती राजवटीसंदर्भात सुधीर मुनगंटीवार यांना काय वाटते, हा त्यांचा प्रश्न आहे. महाराष्ट्रात हे सरकारच कायम राहू नये, असेही त्यांना वाटत असेल. पण हे त्यांचे हे स्वप्न 'मुंगेरीलाल के हसीन सपने'सारखे असल्याची टीका चव्हाण यांनी केली.
हेही वाचा... कोरेगाव-भीमा प्रकरण : 'सहकार्य न करणाऱ्या अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याचा केंद्र सरकारला अधिकार'