मुंबई - सेना आणि भाजप युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजपला पालिकेतील विरोधी पक्षनेते पद दिले नसल्याने त्यांनी पालिका सभागृहात गोंधळ घातला. यावर शिवसेनेने टीका करत 'भाजपने पहारा देतच बसावे', असा टोला लगावला होता. आता भाजपने याला प्रत्युत्तर दिले आहे. अशिष शेलार यांनी ट्विट करत भाजपविरोधी पक्षात बसला तर 'स्टॅंडिंग मधील अंडरस्टँडिंग' उघडे पडेल, असा आरोप त्यांनी केला आहे. तसेच शिवसेनेला घाबरट सेना म्हणावे का असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केलाय.
मुंबई महापालिकेत पुन्हा सेना-भाजप आमने-सामने; आता अशिष शेलार यांची वादात उडी - ashish shelar tweeter
सेना आणि भाजप युती तुटल्यानंतर एकमेकांवर आरोपांच्या फैरी झाडत आहेत. भाजपला पालिकेतील विरोधी पक्षनेते पद दिले नसल्याने त्यांनी पालिका सभागृहात गोंधळ घातला. यावर शिवसेनेने टीका करत 'भाजपने पहारा देतच बसावे', असा टोला लगावला होता. आता भाजपने याला प्रत्युत्तर दिले आहे.
महापालिकेच्या निवडणुकांनंतर भाजपने विरोधी बाकावर बसण्याचा निर्णय घेतला. प्रभाकर शिंदे यांची गटनेतेपदी नियुक्त करतानाच भाजपने विरोधी पक्ष नेते पदावर देखील दावा केला आहे. यासंबंधी पत्र त्यांनी महापौरांना दिले आहे. याबाबत विधी विभागाचा सल्ला घेतल्यावर 2017 च्या निवडणुकीत भाजपाने नकार दिल्याने विरोधी पक्ष नेतेपद काँग्रेसला देण्यात आले. त्यामुळे भाजपाला विरोधी पक्षनेते पद देता येत नसल्याचे महापौर किशोरी पेडणेकर यांनी सभागृहात स्पष्ट केले. विरोधी पक्ष नेतेपद न दिल्याने भाजपच्या नगरसेवकांनी सभागृहात गोंधळ घालत घोषणाबाजी केली. तसेच सभागृहाबाहेरही नगरसेवकांनी ठिय्या आंदोलन केले.
भाजप नेत्यांच्या चुकीमुळे हा प्रकार घडल्याचा आरोप सेनेने केला आहे. भाजपच्या नेत्यांनीच आम्हाला विरोधी पक्ष नेते पद नको असल्याचे सांगितले होते. त्यामुळे भाजपाने शिवसेनेला दोष न देऊ नये असे सेनेच्या वतीने सांगण्यात आले आहे. आता भाजपने पाहरा देण्याचेच काम करत बसावे, असा टोला शिवसेनेच्या सभागृह नेत्या विशाखा राऊत यांनी लगावला आहे. त्यावर उत्तर देताना भाजपचे माजी मंत्री व आमदार आशिष शेलार यांनी एक ट्विट केले. पालिकेत भाजप विरोधी पक्षात बसलेला शिवसेनेला झेपणारे नाही,असे त्यांनी यामध्ये म्हटले आहे. तसेच भाजपच्या मावळ्यांसमोर शिवसेनेची घाबरगुंडी उडाली असून शिवसेनेला घाबरट सेना म्हणावे का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे.