मुंबई - कांजुरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेट्रोच्या कामावर परिणाम होऊन त्याचा फटका मुंबईकरांना बसू नये यासाठी मेट्रो - ३ चे कार शेड आता वांद्रे कुर्ला संकुल येथे बुलेट ट्रेनसाठी प्रस्तावित जागेवर उभारता येते का, या पर्यायाची चाचपणी राज्य सरकार गांभीर्याने करत आहे. त्यामुळे भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर खरमरीत टीका केली.
का 'विकास'शी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय?
मुंबई मेट्रो : मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक 'वातानुकूलित बैलगाडा' मिळणार
कांजुरमार्ग येथे मेट्रो कार शेड उभारण्यास उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. याबाबतची न्यायालयातील सुनावणी दीर्घकाळ चालण्याची शक्यता आहे. मात्र या प्रकरणावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच जुंपली आहे. भाजपा आमदार अशिष शेलार यांनी देखील ट्विट करत ठाकरे सरकारला लक्ष केलयं आहे.
आशिष शेलार यांनी ट्विट करत महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधला आहे. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या कार्यपद्धतीमुळे आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर गेल्याचे त्यांनी अधोरेखित केले. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नियोजनानुसार बीकेसील भूखंडावर बुलेट ट्रेनचे स्टेशन तर पृष्ठभागावर आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र आले. आता विद्यमान मुख्यमंत्र्यांच्या अहंकारी नियोजनातून बीकेसीत जर मेट्रो कारशेड होणार असेल, तर बुलेट ट्रेन होणार नाही. आणि पुन्हा आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र मुंबई बाहेर घालवणार का, असा प्रश्न शेलार यांनी उपस्थित केला आहे. का विकासाशी शत्रू सारखे वागताय? का महाराष्ट्र द्रोह करताय, असे प्रश्न त्यांनी महाविकास आघाडी सरकारला विचारले आहेत.
अशिष शेलार यांचे ट्वीट
बुलेट ट्रेन नकोच म्हणताय, मेट्रो होऊच नये अशी व्यवस्था करताय! बेस्टचे खासगीकरण करून मुंबईकरांची महत्त्वाची व्यवस्था मोडित काढताय... मुंबईकर हो! ठाकरे सरकारचा हा तीन तिघाडा...मुंबईकरांना भविष्यात प्रवासासाठी बहुतेक मिळणार "वातानुकूलित बैलगाडा!"