महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

महाराष्ट्र एटीएस झोपलंय का?; दहशतवाद्यांच्या अटकेनंतर आशिष शेलारांचा सवाल - ashish shelar slams mahavikas aghadi government

मुंबईत आणि राज्यात दहशतवादी कटकारस्थान सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे.

ashish shelar
आशिष शेलार

By

Published : Sep 15, 2021, 6:55 PM IST

Updated : Sep 15, 2021, 7:29 PM IST

मुंबई - घातपात करणाच्या तयारीत असलेल्या दहशतवाद्यांना दिल्ली पोलिसांनी अटक केली आहे. यात महाराष्ट्रातून जान मोहम्मद शेखला धारावीतून स्पेशल सेलने अटक केली. मुंबईत आणि राज्यात अशी कट कारस्थान सुरू असताना महाराष्ट्र राज्याचे दहशतवाद विरोधी पथक (एटीएस) झोपलंय का? असा सवाल भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. पोलिसांवर असलेल्या राजकीय दबावामुळे त्यांचं अशा गोष्टींकडे दुर्लक्ष होतंय, असा आरोपही त्यांनी यावेळी केला.

भाजप नेते आमदार आशिष शेलार

हेही वाचा -इंटेलिजन्स फेल्युअर नाही, राजकारण करण्यापेक्षा सहकार्य करा; गृहमंत्र्यांनी विरोधकांना सुनावलं

  • गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी -

नॅान कॅाग्निजेबल ऑफेन्समध्ये केंद्रीय मंत्र्यांना अटक करणारे राज्याचे पोलीस, पत्रकारांना हात नाही पाय लावू अशी भाषा करणारे पोलीस, विद्यमान आमदाराला लुक आउट नोटीस काढण्याचा प्रताप करणारे पोलीस दहशतवाद्यांच्या बाबतीत का झोपले होते हे गृहमंत्री स्पष्ट करतील का? या दहशतवादी प्रकरणाची इंटेलिजन्स माहिती पोलिसांना, गृहमंत्र्यांनी होती तर मग एका विशिष्ट वर्गाबाबत मवाळ भूमिका असे राजकीय प्रकरण नाही ना? असा सवाल करत पोलिसांच्या इंटेलिजन्स फेल्युअरवर गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

  • आमचे पोलीस सक्षम आहेत -

आता सरकार बैठका घेत असले तरी झालेल्या अक्षम्य दुर्लक्षांवर आता पांघरुण घालता येणार नाही. राज्यकर्ते हे पोलिसांचे लक्ष नको त्या विषयात घालतात, मग अशा घटना घडतात. आमचे पोलीस सक्षम आहेत पण राजकीय दबाव, सरकारची गटबाजी, वसुलेबाजी आणि सौदेबाजी यामुळे ही स्थिती आली, असेही शेलार म्हणाले. चौकशी अजून वाढवावी आणि गृहमंत्र्यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी, असे आवाहन शेलार यांनी केले आहे.

हेही वाचा -दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलकडून आणखी तीन दहशतवाद्यांना युपीमधून अटक

Last Updated : Sep 15, 2021, 7:29 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details