महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Shelar slammed Mahavikas Aghadi : महाविकास आघाडी सरकारचे काम म्हणजे भ्रष्टाचारासह गुन्हेगारी - आशिष शेलारांचा आरोप - लोकशाही विरुद्ध घराणेशाही संघर्ष

भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, की सर्वसामान्य जनतेला मदत कशी मिळेल या सगळ्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारचा कानाडोळा ( issues in Maharashtra ) आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi gov ) भ्रष्टाचार ( corruption in Maharashtra ) , गुन्हेगारी व दहशतवाद यांच्यासाठी काम करत असल्याचा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला.

भाजप समितीची बैठक
भाजप समितीची बैठक

By

Published : Feb 25, 2022, 3:08 PM IST

Updated : Feb 25, 2022, 3:22 PM IST

मुंबई - भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक भाजप प्रदेश कार्यालय मुंबई ( BJP core committee meeting ) येथे सुरू आहे. या बैठकीमध्ये सध्याच्या राजकीय घडामोडींवर व एकंदरीत तापलेल्या राजकीय वातावरणावर चर्चा केली जात आहे. या बैठकीविषयी बोलताना भाजप नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून ( Ashish Shelar slammed Mahavikas Aghadi ) टीका केली आहे.


रामराज्य येण्यास सुरुवात-
भाजपचे नेते आशिष शेलार म्हणाले, की सर्वसामान्य जनतेला मदत कशी मिळेल या सगळ्या प्रश्नांवर महाविकास आघाडी सरकारचा कानाडोळा ( issues in Maharashtra ) आहे. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार ( Mahavikas Aghadi gov ) भ्रष्टाचार ( corruption in Maharashtra ) , गुन्हेगारी व दहशतवाद यांच्यासाठी काम करत असल्याचा टोलाही आशिष शेलार यांनी लगावला. भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरुपाचे वर्णन करावे लागेल. इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्र सरकारची आहे. भारतीय जनता पक्षाने ठरवलेय, की मोदीजी यांच्या नेतृत्वात 2014 पासून आम्ही जनतेला "ना खाऊंगा, ना खाने दुंगा" वचन दिले. 2014 पासून टप्प्याटप्प्याने याला सुरुवात झाली आहे. लोकशाही विरुद्ध घराणेशाही या संघर्षाला सुरुवात होऊन आता टोक गाठले आहे. रामराज्य येण्यास आता सुरुवात झाली आहे असेही शेलार म्हणाले.

भाजपच्या प्रदेश कोअर कमिटीची बैठक

हेही वाचा-War Affected Areas In Ukraine : युक्रेन रशिया युद्धाची भीषणता : पाहा VIDEO

भ्रष्टाचार केला तर कारवाईला सामोरे जा
शिवसेना उपनेते यशवंत जाधव यांच्या घरावर प्राप्तिकर विभागाने घातलेल्या धाडीविषयी बोलताना शेलार म्हणाले, यंत्रणा आपले काम करत आहेत. त्या निष्पक्ष आहेत. पदावर बसलेल्या लोकांनी कायदे कानून पाळणे आवशयक आहे. स्वतःवर असलेल्या कारवाई आणि आरोपाचे उत्तर देता येत नाही. त्यामुळे राजकीय वक्तव्य केली जात आहे. हे जर सूडबुद्धीचे असेल असे वाटत असेल तर न्यायालयात जावे. सत्य जे आहे ते समोर येईल. जर कारवाई पालिकेतील घोटाळ्याची झाली असेल तर लवकरच समजेल.
भूमीपत्राच्या कष्टावर भ्रष्टाचाराचे मजले बांधले जात आहेत, असेही शेलार म्हणाले. जर भ्रष्टाचार केला असेल तर कारवाईला सामोरे जावेच लागेल, असा शेलार यांनी इशारा दिला आहे.

हेही वाचा-Nawab Malik Arrested : नवाब मलिक यांना पोटदुखी, जेजे रुग्णालयात दाखल

Last Updated : Feb 25, 2022, 3:22 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details