मुंबई - मे आणि जून महिन्यात लोकांना पाणी कपातीचा सामना करावा लागतो. पाणी कपातीचं हे संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी पिण्यायुक्त करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पावरती भाजपा आमदार आशिष शेलार यांनी टीका करत समुद्राचे रोज 200 दशलक्ष लिटर पाणी गोडे करण्यासाठी 1600 कोटींच्या प्रकल्पाची गरज आहे का? असा सवाल शिवसेनेला विचारला आहे.
"मुंबईकरांचे 1600 कोटी समुद्रात का टाकताय" - ashish shelar news
पाणी कपातीचं संकट टाळण्यासाठी मनोर येथील समुद्राचे 200 एमएलडी खारे पाणी दैनंदिन वापरायोग्य करण्याचा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पावर भाजपाचे आमदार अशिष शेलार यांनी टीका केली आहे. मुंबईकरांचे 1600 कोटी "समुद्रात" का टाकताय, असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
!["मुंबईकरांचे 1600 कोटी समुद्रात का टाकताय" ashish shelar on BMC](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-9650571-220-9650571-1606220490197.jpg)
जर 1600 कोटींच्या 40% खर्चात सध्याची गळती थांबली, तर रोज 200 दशलक्ष लिटरच्या दुप्पट पाणी वाचेल, असे ते म्हणाले. मुंबईचा दररोज पाणी पुरवठा 3800 दशलक्ष लिटर आहे. तर शहरातील गळतीमुळे रोज वाया जाणारे पाणी सुमारे 900 दशलक्ष लिटर आहे. पालिका आणि आंतरराष्ट्रीय मानकाप्रमाणे कमीतकमी 10% म्हणजे 380 दशलक्ष लिटर पाण्याची गळती सहज थांबवता येऊ शकेल.
आमच्या एच/वेस्ट प्रभागात, माझ्या प्रयत्नांनी पायलट प्रोजेक्ट करून एका वर्षात गळतीने वाया जाणारे 100 कोटी लिटर पाणी वाचवल्याची माहिती त्यांनी दिली. पालिका 24 प्रभागात असा प्रयत्न करून वाया जाणारे पाणी का वाचवत नाही? मग मुंबईकरांचे 1600 कोटी "समुद्रात" का टाकताय अशी टीका देखील शेलार यांनी केली आहे.