मुंबई- काल विधानसभा सभागृहामध्ये कायदा व सुव्यवस्थेच्या प्रश्नावर बोलताना विरोधी पक्षनेते देवेंद्र फडवणीस यांनी मुंबई बँक घोटाळा प्रकरणी प्रवीण दरेकर यांच्यावर गुन्हा नोंदवला जाऊ शकतो, अशा पद्धतीचे वक्तव्य केलं होत. कालच रात्री उशिरा प्रवीण दरेकर यांच्यावर मुंबई पोलीस स्टेशन मध्ये फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. या प्रश्नावर बोलताना भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी हे संपूर्ण षडयंत्र असल्याचे म्हटले आहे.
बदलेकी भावना से -
प्रवीण दरेकर यांच्यासंदर्भात जो गुन्हा दाखल झाला आहे तो जाणीवपूर्वक करण्यात आलेला आहे. हे महाविकास आघाडी सरकार सूडबुद्धीने प्रवीण दरेकर यांच्यावर कारवाई करणार होतेच. ज्या पद्धतीचा गुन्हा दाखल केला आहे, त्यावर कायदेशीर मत आम्ही मांडूच. परंतु अशा पद्धतीने बऱ्याच जणांनी कोणी शेतकरी कोणी कामगार अशा पद्धतीने सरकारी योजनांचा फायदा घेतला आहे. हे सर्व बघता बदलेकी भावना से गुन्हा दाखल केला आहे असेही आशिष शेलार म्हणाले.
राणे यांच्या बंगल्यात दुर्बीण
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जुहू स्थित बंगल्याला अधिकृत असल्याचे सांगत मुंबई महानगरपालिका वारंवार नोटीस पाठवत आहे. जणूकाही मुंबईत एकच अनधिकृत बांधकाम झाले आहे अशा पद्धतीने केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या घरावर कारवाई करत आहे. हे सरकार मालवणी समोर झुकले व आता प्रहार करायला निघाले असे झाले आहे. तेरा घर मेरे घर से अच्छा कैसा? या भावनेतून हे होत आहे का? असा प्रश्नही आशिष शेलार यांनी उपस्थित केला. याबाबत अशिष शेलार यांनी एक ट्विट सुद्धा केले आहे.
काय आहे ट्विटमध्ये -
शिवसेनेची गेल्या २५ वर्षात दारूच्या टेमकर मुल्ला, पाखमोडे स्ट्रीट, मेमन च्या हुसेनी बिल्डींग, मोहम्मद अली रोड, मालवणीतील अनधिकृत बांधकामावर हातोडा उगारण्याची हिम्मत नाही. पण माननीय नारायण राणे यांच्या बंगल्यात दुर्बीण लावून शोधकार्य सुरू आहे. मालाड मालवणी समोर हार व मालवणी माणसावर प्रहार अशा पद्धतीचे ट्विट अशिष शेलार यांनी केले आहे.
डॉक्टर लांबे व भाजपाचा संबंध नाही
काल विधानसभेमध्ये पेन ड्राइव च्या माध्यमातून वक्फ बोर्ड सदस्य डॉक्टर लांभे व दाऊद समर्थक अरशद खान यांच्या ऑडिओ चा पेन ड्राईव्ह देवेंद्र फडणवीस यांनी सादर केल्यानंतर यावर राजकीय वातावरण तापू लागल आहे. डॉक्टर लांभे यांची नियुक्ती देवेंद्र फडवणीस यांनीच केली होती असा आरोपही आता होत आहे. त्याबरोबर त्यांच्याबरोबर असलेले संबंधांचे फोटो सुद्धा व्हायरल होत आहे. याविषयी बोलताना अशिष शेलार म्हणाले की मोहित कंबोज यांनी सुद्धा राष्ट्रवादी प्रमुखांचा फोटो डॉक्टर लांभे सोबत असल्याचा दाखवला आहे. डॉक्टर लांभे व भाजप यांचा काही संबंध नाही. कुठला तरी जुना फोटो वायरल होत आहे. असेही शेलार म्हणाले.