महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

सचिन वाझे आणि मुंबईच्या नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करा - आशिष शेलार - सचिन वाझे आणि मुंबईच्या नालेसफाई बद्दल बातमी

सचिन वाझे आणि मुंबईच्या नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी अशिष शेलार यांनी केली आहे. शेलार यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी ही मागणी केली.

Ashish Shelar demands probe into Sachin Waje and Mumbai's non-sanitation connection
सचिन वाजे आणि मुंबईच्या नालेसफाईच्या कनेक्शनची चौकशी करण्यात यावी - आशिष शेलार

By

Published : Jun 7, 2021, 4:39 PM IST

मुंबई - निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेवर नालेसफाई करणाऱ्या कंत्राटदारांकडून पैसे वसूल करण्याची जबाबदारी होती. त्यामुळे वाझे आणि नालेसफाईच्या कामाची चौकशी झाली पाहिजे, असा आरोप भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी आज केला आहे. आशिष शेलार यांनी आज मुंबईतील नालेसफाईच्या कामाची पाहणी केली यावेळी त्यांनी ही मागणी केली. सचिन वाझेला पालिकेच्या कंत्राटदारांकडून वसुली करण्यास सांगण्यात आले होते. तशी माहिती कोर्टाच्या रेकॉर्डवर आली आहे. त्यामुळे नालेसफाईच्या कामाची आणि वाझेची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी शेलार यांनी केली आहे.

नालेसफाईचा दावा खोटा -

मुंबई महापालिकेची मान्सूनपूर्व तयारी पूर्णपणे झालेली नाही. नालेसफाईचे काम 100% पूर्ण झाल्याचा पालिकेचा दावा खोटा आहे. नालेसफाई करून दाखवण्याचा दावा करणाऱ्या शिवसेनेला या जबाबदारीतून हात झटकता येणार नाहीत. 70 कोटी रुपये नालेसफाईसाठी खर्च केलेल्या महापालिकेला त्याचा हिशोब द्यावा लागेल, असे सांगतानाच शिवसेनेने नाल्यावर शेती करण्याची नवीन योजना सुरू केल्याचा टोलाही त्यांनी लगावला आहे.

नालेसफाईचा गाळ कुठे टाकला? फोटो दाखवा -

दरम्यान यापूर्वी शेलार यांनी नालेसफाईवरून पालिकेवर टीका केली होती. 70 कोटी खर्च करुन केलेली नालेसफाई संपूर्ण आभासी आहे. विषय दाव्याचा नाही आश्वासन दिले त्याचा आहे, मुंबईकरांना शब्द दिला होता, मुंबई तुंबू देणार नाही. आता बचाव करू नका, पळून जाऊ नका. 5 लाख मॅट्रिक टन गाळ काढला म्हणता, मिठी नदीचा जरी गाळ पकडला तरी तो टाकला कुठे?, असा सवाल त्यांनी केला होता. ते सरकारी डम्पिंग ग्राऊंड असेल तर गाळ टाकल्याचा फोटो दाखवा, खासगी असेल तर सीसीटीव्ही दाखवा, गाळ कुठे मोजला त्या वजन काट्याच्या पावत्या दाखवा, असे आव्हान देतानाच नालेसफाईत सुद्धा कट कमिशन सुरू असल्याचा आरोपही त्यांनी केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details