महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

राजभवनाकडे तोंड करून उगाच का बोंबा मारताय? - ashish shelar news

घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे पद असणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा थेट प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली होती. त्याला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

ashish shelar on uddhav thackeray
'पत्रपंडित' बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते, असे शेलार म्हणाले.

By

Published : Apr 20, 2020, 7:06 PM IST

मुंबई - घटनात्मकदृष्ट्या महत्त्वाचे पद असणाऱ्या राज्यपालांच्या राजभवनाकडे बघून का बोंबा मारताय? असा थेट प्रश्न भाजपचे आमदार आशिष शेलार यांनी केला आहे. खासदार संजय राऊत यांनी राज्यपालांच्या भूमिकेवर टीका केली होती. त्याला शेलार यांनी प्रत्युत्तर दिले आहे. तसेच ज्या वेळी मित्रपक्षांची दोन नावे सुचवण्यात आली; त्यावेळी मुख्यमंत्र्यांचे नाव राज्यपालांना का सुचवले नाही? असा सवाल त्यांनी केलाय. यवतमाळच्या पोटनिवडणुकीत मुख्यमंत्र्यांना उमेदवारी न देण्याबाबत देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. यवतमाळच्या पोटनिवडणुकीचे राजकारण आपण विसरल्याची आठवण शेलार यांनी करून दिली.

'पत्रपंडित' बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते, असे शेलार म्हणाले.

त्यांनी शिवसेनेच्या एका नेत्याला पत्रपंडित असे म्हटले. 'पत्रपंडित' बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते, असे शेलार म्हणाले. राजभवनाकडे तोंड करून काल पत्रपंडित काहीतरी बोलले. काय होतं ते, असा प्रतिप्रश्न त्यांनी केला. पुढे बोलताना, राज्यपाल हे घटनात्मक पद आहे. त्यांना लोकशाहीने जे अधिकार दिलेत त्यानुसार ते निर्णय घेतील. यासाठी कोणालाही दबाव आणण्याची आवश्यकता नसल्याचे शेलार यांनी म्हटले.

'पत्रपंडित' बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते, असे शेलार म्हणाले.

'लोकशाहीच्या नावाने गळा काढणाऱ्यांनी लोकशाहीने वागा', असा टोला देखील त्यांनी लगावलाय.

'पत्रपंडित' बोलायला लागले की, डरावडराव करणाऱ्या प्राण्याची आठवण होते, असे शेलार म्हणाले.

ABOUT THE AUTHOR

...view details