मुंबई - सन्मानीय विधानसभा अध्यक्ष, विधानपरिषद सभापती तुमची मागणी चुकली आहे. विधिमंडळाने जे पत्रकार परिषदेत मांडले ते न्यायालयात मांडले गेले आहे. तानाशाही हरली लोकशाही जिंकली. महाविकास आघाडीच्या अहंकाराचे वस्त्रहरण झालेला निवाड्याचा आपण दाखला देता. आपण ते वाचले असते तर पत्रकार परिषद घेतली नसती, अशी टीका भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडीवर केली ( Ashish Shelar Criticized Mahavikas Aghadi ) आहे.
बारा आमदारांचे निलंबन सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्याबाबत विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ आणि उपसभापती निलम गोऱ्हे यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेतली. यावेळी न्यायालयाच्या निकालामुळे सत्ता संतुलन आणि सत्ता नियंत्रण बाधित झाले आहे. त्यामुळे हा विषय घटनापीठाकडे सोपवावा अशी मागणी केली. त्यावर आज आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे.