महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

शरद पवारांनीही पाळला होता संयम; भाजप नेते आशिष शेलारांची फटकेबाजी

शेलार यांनी थेट शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत, पवारांना कानशिलात लावलेले देशाने पाहिले. पवारांनी त्यावेळी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले, मात्र संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी खरमखरीत टीका शेलार यांनी केली.

BJP leader Ashish Shelar
भाजप नेते आशिष शेलार

By

Published : Aug 25, 2021, 7:28 PM IST

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटकेवरून भाजप नेते आशिष शेलार यांनी शिवसेनेवर पत्रकार परिषद घेऊन जोरदार शाब्दिक हल्ला चढवला. शेलार यांनी थेट शरद पवारांसोबत घडलेल्या घटनेचा दाखला देत, पवारांना कानशिलात लावलेले देशाने पाहिले. पवारांनी त्यावेळी संयम पाळून त्या व्यक्तीला माफ केले, मात्र संयमी माणसासोबत राहूनही शिवसेनेला ते कळत नाही, अशी खरमखरीत टीका शेलार यांनी केली.

हेही वाचा -Narayan Rane Case : नारायण राणेंना 17 सप्टेंबरपर्यंत हायकोर्टाचा दिलासा

परब यांचा हस्तक्षेपाची शक्यता

अनिल परब गृहखात्यात हस्तक्षेप करत असल्याबद्दल शरद पवार यांनी एकदा नाराजी व्यक्त केली होती. मंगळवारी देखील परब यांनी हस्तक्षेप केल्याचा प्रकार समोर आला आहे. आमच्या माहितीनुसार, अटकपूर्व जामीन अर्ज 4 ते साडेचारच्या दरम्यान निकाली निघाला. त्याआधीच मंत्री अनिल परब सांगत आहेत की, जामीन नाकारण्यात येणार आहे. याचा अर्थ दलालांमार्फत किंवा या प्रक्रियेमध्ये हस्तेक्षेप करण्याचा मंत्रिमहोदयांनी प्रयत्न केला असावा, अशी दाट शंका आहे. मुंबई उच्च न्यायालयाची बदानामी आणि अपमान करण्याचा हा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.

सीबीआय चौकशी करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अटक प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी केंद्राला जबाबदार असतात. राणे केंद्रीय मंत्री आहेत. राज्याचा एक मंत्री आयपीएस अधिकाऱ्यांना केंद्रीय मंत्र्याच्या अटकेसाठी फोन करत होता. कोर्टात त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात येईल, असा निवाडा ते घोषित करत होते. हे सगळे प्रकरण संशयास्पद असून याची सीबीआय चौकशी करावी, अशी मागणी शेलार यांनी केली.

मुख्यमंत्र्यांचे अज्ञान

मुख्यमंत्री यांना स्वातंत्र्याचा कुठला मोहोत्सव आहे, हे अज्ञानपण आहे की, जाणून बुजून करत आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री यांच्या विरोधात बोलताना संयम ठेवला पाहिजे, असे सांगितले होते. मात्र, मुख्यमंत्री यांच्या स्वातंत्र्य दिनाचे अज्ञानपण जाहीर झाल्याने सेनेचा हा थयथयाट सुरू असल्याचे शेलार म्हणाले.

भाजप युवा मोर्चा उद्धव ठाकरे यांना 75 हजार पत्र लिहणार असून हा स्वातंत्र्यदिन अमृतमोहत्सवी वर्ष आहे, हे सांगणार आहे. मुख्यमंत्री यांनी त्यांनतर भूमिका स्पष्ट केली नाही तर फुलांचे काटे पाठवून मुख्यमंत्री यांना आठवण करून देऊ, असा इशारा शेलार यांनी दिला.

सुरुवात तुम्ही केली, शेवट आम्ही करणार - शेलार

मंत्रालयात सुभाष जाधव या शेतकऱ्याने आत्महत्या केली. इंदापूर शिवाजी चिमळकर या शेतकऱ्याने आत्महत्येचा प्रयत्न केला. पालघरमध्ये 500 रुपयांसाठी आदिवासी कुटुंबाने आत्महत्या केली. राज्य सरकरला कंटाळून आत्महत्या होत आहेत. गलिच्छ राजकारण केले जात आहे. जनक्षोभ वाढत आहे. लक्ष भटकविण्यासाठी शिवसेना आंदोलन करत आहे. महाविकास आघाडी सरकारची सत्तेसाठी सगळी मिलीभगत आहे, मात्र सुरुवात तुम्ही केली असून शेवट आम्ही करणार असल्याचे शेलार म्हणाले.

ठाकरेंच्या पोटात दुखत आहे

नारायण राणे मुख्यमंत्री होते त्यावेळीही उद्धव ठाकरेंनी षडयंत्र केले. सुरेश प्रभूंना केंद्रात मंत्रिपद मिळाले, त्यावेळी ठाकरेंनी तेच केले. आता कोकणातील नेत्याला केंद्रात मोठे पद मिळाले म्हणून उद्धव ठाकरेंच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे, शिवसेनेने हे षडयंत्र रचले होते. पोलिसांना बाजूला ठेवा आणि मग आंदोलन करायला या, मग बघू, असा इशारा शेलार यांनी देत, राज्यातील सरकार दबावतंत्राचा वापर करत असल्याचा आरोप केला.

हेही वाचा -किरीट सोमैया यांनी ज्योतिषाचा धंदा सुरू करावा - महेश तपासे

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details