मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला २०१७ मध्येच ( Ashish Shelar on NCP BJP coalition plan ) ठरवला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्याने खो घातला, असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar on NCP ) यांनी मुंबईत केला.
Ashish Shelar on NCP BJP coalition : राष्ट्रवादी - भाजप सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला ठरला होता, पण.. आशिष शेलारांचे गौप्यस्फोट - भाजप राष्ट्रवादी युती आशिष शेलार माहिती
राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप सत्ता स्थापनेचा फॉर्म्युला २०१७ मध्येच ( Ashish Shelar on NCP BJP coalition plan ) ठरवला होता. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या शीर्षस्थ नेत्याने खो घातला, असा गौप्यस्फोट भाजप आमदार आशिष शेलार ( Ashish Shelar on NCP ) यांनी मुंबईत केला.
राज्यात महाविकास आघाडी सरकार आणि विरोधी पक्ष भाजप यांच्यात अनेक मुद्द्यांवरून आरोप - प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. आघाडी सरकारवर टीका ( Ashish Shelar comment on NCP news ) करण्याची एकही संधी भाजपकडून सोडली जात नाही. आघाडी सरकारकडूनही भाजपला जोरदार प्रत्युत्तर दिले जात आहे. भाजप आमदार आशिष शेलार यांनी शिवसेना, भाजप युतीवर भाष्य करताना मोठा खुलासा केला.
देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्या शपथविधीच्या दोन वर्ष आधीच राष्ट्रवादी काँग्रेससोबत युती ( NCP BJP coalition plan 2017 ) करण्याची चर्चा झाली होती. शिवसेनेकडून रोज खिशात राजीनामे असल्याची दिली जाणारी धमकी, आक्रमक भाषेमुळे प्रचंड त्रास होत होता. त्यामुळे, राज्यात राष्ट्रवादी आणि भाजपचे सरकार करावे, असा निर्णय महाराष्ट्र भाजपने घेतला. फॉर्म्युलाही ठरला होता. मात्र, भाजपच्या पक्ष नेतृत्वाने शिवसेनेला सोबत घेऊन तीन पक्षाचे सरकार करण्याचा प्रस्ताव ठेवला. राष्ट्रवादी काँग्रेसने त्यामुळे युती करण्यास नकार देत, शिवसेनेसोबत आमचे जुळणार नाही, अशी भूमिका घेत खो घातला. मात्र, २०१९ मध्ये सत्ता दिसल्यावर शिवसेनेने भाजपला सहज सोडून दिले आणि राष्ट्रवादीसोबत युती केली, असे शेलार म्हणाले.