महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

Ashish Shelar Attack on Aditya Thackeray : वरळीतील स्मशानभूमींची दुरवस्था; आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केले 'हे' सवाल - आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील स्मशानभूमीची दुरवस्था ( Poor condition of Worli cemetery ) झाली आहे. १८ हजार कोटी रुपये खर्च करून समुद्राचे पाणी गोड करायला निघालेल्या महापालिका मतदारांना मरणानंतरही छळणार आहेत का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar Attack on Aditya Thackeray ) केला आहे.

BJP MLA aashish shelar on tourism minister aaditya thakare
आशिष शेलार यांनी आदित्य ठाकरेंना केले 'हे' सवाल

By

Published : Jan 25, 2022, 3:28 PM IST

मुंबई - राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघातील स्मशानभूमीची दुरवस्था ( Poor condition of Worli cemetery ) झाली आहे. १८ हजार कोटी रुपये खर्च करून समुद्राचे पाणी गोड करायला निघालेल्या महापालिका मतदारांना मरणानंतरही छळणार आहेत का? असा सवाल भाजप आमदार आशिष शेलार यांनी ( Ashish Shelar Attack on Aditya Thackeray ) केला आहे.

आशिष शेलार यांची प्रतिक्रिया

'वरळी मधल्या लोकांना मरणानंतरही महापालिका का छळते आहे?'

मुंबई महानगरपालिका आपल्या कर्तव्यात कसूर करीत आहे. गेल्या पंचवीस वर्षांपासून शिवसेनेची मुंबई महानगरपालिकेवर सत्ता आहे मात्र वरळी विधानसभा मतदारसंघाचे आमदार आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याच मतदार संघात स्मशानभूमी दुरवस्था आहे. वरळी येथील स्मशानभूमी विकसित करण्यासाठी खाजगी लोकांना देण्यात आली आहे. महानगरपालिका समुद्राचे पाणी गोड करण्यासाठी १८ हजार कोटी रुपयांचा प्रकल्प उभारणार आहे. मात्र वरळी मधल्या लोकांना मरणानंतरही महापालिका का छळते आहे? असा सवाल आमदार आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा -Mumbai Republic Day 2022 : प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री राहणार उपस्थित

ABOUT THE AUTHOR

...view details