मुंबई - भाजपकडून सरकारच्या विरोधात आंदोलन आणि त्यासाठी ट्वीटरवर @BJP4Maharashtra नावाने हॅशटॅग वापरून मोहीम चालविण्यात आली, तर त्या विरोधात काँग्रेसकडून ट्वीटरवर #महाराष्ट्रदोहीBJP ही मोहीम चालविण्यात आली. यात कोणाच्या ट्रेंडचा पहिला क्रमांक आला, यावर भाजपचे ज्येष्ठ नेते ॲड. आशिष शेलार आणि काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांच्यात बरीच जुंपली आहे. आपलाच ट्रेंड अधिक चालला असा दावा करत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करून घेतल्याने ट्वीटर ट्रेंडचे वार चांगलेच रंगले आहे.
आंदोलनात कोणाचा 'ट्रेंड' चालला, सावंत-शेलारांमध्ये जुंपले ट्वीटर वॉर - mera aangan mera ranangan
राज्यात कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत भाजपने राज्यभरात आंदोलन छेडले. त्यासाठी त्यांनी ट्वीटरवर @BJP4Maharashtra ही मोहीम राबवली. त्याविरोधात सत्ताधारी आघाडीने #महाराष्ट्रदोहीBJP हा टॅग वापरला.
राज्यात कोरोनाने निर्माण झालेली परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी ठरल्याचा दावा करत भाजपने राज्यभरात आंदोलन छेडले. त्यासाठी त्यांनी ट्वीटरवर @BJP4Maharashtra ही मोहीम राबवली, तर दुसरीकडे या आंदोलनाला विरोध करण्यासाठी काँग्रेससह इतर सत्ताधारी पक्षांकडून भाजपविरोधात ट्वीटरवर #महाराष्ट्रदोहीBJP हा हॅशटॅग वापरून त्याविरोधात मोहीम चालविण्यात आली. यावर सावंत यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून 'केंद्र सरकारच्या २० लाख कोटींच्या पॅकेजप्रमाणेच @BJP4Maharashtra ने आजच्या त्यांच्या आंदोलनात २.५ लाख कार्यकर्ते सहभागी झाल्याची सोलकढी थाप मारली आहे.
सत्तेत असताना लागलेली आकडे फुगवण्याची खोड सत्तेबाहेर जाऊनही गेली नाही. शेतकरी कर्जमाफीचा ३४ हजार कोटींचा आकडाही असाच फुगवला होता' असा आरोप केला. यामुळे भाजपचे नेते आशिष शेलार यांनी सावंत यांना प्रत्युत्तर देण्यासाठी लगेचच ट्वीट करून '24×7 खोटं बोलणारे @sachin_inc आज उताणे पडले.."महाराष्ट्र बचाव" ला ट्विटवर काय प्रतिसाद मिळाला याचा हा घ्या पुरावा...! खोटारडे सावंत तुम्ही, आता कान धरून उठाबशा काढा आणि तातडीने प्रेसनोट मागे घ्या!' अशी मागणी केली. यावर सावंत यांनी भाजपच्या ट्रेंडला उत्तर प्रदेश बिहार आदी राज्यांतून कसा प्रतिसाद मिळाला याचे दाखले देत त्यांचा ट्रेंड आणि आकडेवारी कशी खोटी आहे, हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला.