मुंबई -राज्यात गेल्या दीड महिन्यांपासून शिंदे फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे मात्र सरकार अस्तित्वात आले असले तरी मंत्रिमंडळाचा विस्तार सव्वा महिना रखडला होता आणि अद्याप मंत्रिमंडळाचे खाते वाटपही झालेले नाही खाते वाटप झाले नसल्याने अनेक विभागाशी संबंधित कामे प्रलंबित आहे संबंधित खात्याच्या मंत्र्यांची सही फाईलवर झाल्याशिवाय त्याला अंतिम मंजुरी मिळत नाही त्यामुळे अनेक फायलीचा ढिगारा मंत्रालयात साचून राहिला आहे जनतेच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या अनेक कामांना त्यामुळे अडथळा निर्माण झाला आहे सर्व महत्त्वाची अत्यंत संवेदनशील व्यवस्था असलेल्या आरोग्य यंत्रणेवर या अस्थिरतेचा सर्वात अधिक परिणाम झाला आहे
सोळा रुग्णालयातील संगणक प्रणाली बंदराज्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि १६ शासकीय रुग्णालयांमध्ये रुग्णांच्या नोंदी घेण्यासाठी तसेच रुग्णांवरील उपचारांची आणि त्यांच्या तपासण्याची अचूक नोंद ठेवण्यासाठी संगणक प्रणाली कार्यरत होती मात्र सदर संगणक प्रणाली पुरवणाऱ्या कंपनीची निधीवरून शासनाचा वाद निर्माण झाला आहे हा वाद अद्यापही प्रलंबित असल्याने एच एम आय एस ही संगणक प्रणाली गेल्या सहा जुलैपासून बंद आहे. रुग्णालयांमध्ये कर्मचाऱ्यांना सर्व कारभार हाताने लिहून करावा लागत आहे यामुळे फायलींचे गठ्ठे तयार होत आहेत तर या सर्व प्रक्रियेसाठी वेळ लागत असल्याने रुग्णालय प्रशासनावर मोठा ताण आला आहे त्यातच रुग्णांच्या लांबलचक रांगा लागत असून रुग्ण संतप्त होत आहेत या संदर्भात भायखळा येथील जे जे शासकीय रुग्णालयात आलेल्या सारिका पाटील सांगतात की मला सोनोग्राफी करण्यासाठी तीन वेळा रुग्णालयात यावे लागले आहे प्रत्येक वेळेला मला नवी तारीख दिली जाते मात्र रुग्णांची असलेली गर्दी आणि संगणक प्रणाली नसल्याने होणारा कामाला विलंब यामुळे मला वारंवार यावे लागत आहे सरकारने याची दखल घेऊन लवकर व्यवस्था करावी अशी मागणी पाटील यांनी केली